32 C
Mumbai
Wednesday, December 24, 2025
घरविशेषएअरटेल ५जी मुंबईत लवकरच सुरु

एअरटेल ५जी मुंबईत लवकरच सुरु

Google News Follow

Related

एअरटेल ५जी नेटवर्क टेस्ट ट्रायल सोमवारी मुंबईच्या लोअर परळ परिसरामध्ये सुरु करण्यात आले आहे. फिनिक्स मॉलमध्ये नोकिया ५जी गियरचा वापर करत टेलिकॉम दिग्गजांद्वारे ५जी नेटवर्कचे ट्रायल करण्यात आले. एअरटेलच्या ट्रायल नेटवर्कच्या स्पीड टेस्टचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्या व्हिडिओवरून असे लक्षात येते कि कंपनी ५जी टेस्ट ट्रायलदरम्यान अल्ट्रा-लो लेटेन्सीसह १.२ जीबीपीएसचा स्पीड प्राप्त करण्यास यश मिळाले आहे. त्याचबरोबर कंपनीने ८५० एमबीपीएसच्या आसपास अपलोड स्पीड प्राप्त करण्यासही यश मिळवले आहे.

ज्यावेळी गुडगावच्या सायबर हब एरियामध्ये ५जी नेटवर्क ट्रायल करण्यात आली होती, त्यावेळी एयरटेलने १ जीबीपीएसचा आधीच स्पीड मागे टाकला होता. सर्वात प्रथम ईटी टेलीकॉमने या गोष्टीची माहिती दिली आहे. अशाच प्रकारच्या ट्रायल लवकरच कोलकाता शहरात सुरु होणार आहेत. या वर्षाच्या जानेवारीत एअरटेल हे एनएसए (नॉन-स्टँड अलेन) नेटवर्क टेक्नोलॉजीच्या माध्यमातून हैदराबादमध्ये १८०० मेगाहर्ट्ज बॅण्डमध्ये एका कमर्शियल नेटवर्कवर ५जी सर्व्हिसला यशस्वी प्रदर्शित करणारे पहिले टेलिकॉम नेटवर्क बनले.

टेलिकॉम विभागाने एअरटेलला मुंबई, कोलकाता, बेंगळुरू आणि दिल्लीसह चार भारतीय टेलिकॉम सर्कल्समध्ये स्पेक्ट्रम वितरित केले आहेत. यासंबंधी वृत्तात म्हटले आहे की, एअरटेलच्या ३५०० मेगाहर्ट्ज, २८ गीगाहर्ट्झ आणि ७०० मेगाहर्ट्जमध्ये ५जी ट्रायल स्पेक्ट्रम वितरीत करण्यात आले आहेत. रिलायन्स जिओ आणि व्होडाफोन आयडियाला ७०० मेगाहर्ट्झ, ३.५ गीगाहर्ट्झ आणि २६ गीगाहर्ट्झ बॅंडमध्ये स्पेक्ट्रम अलॉट झाला आहे. टीएसपीमध्ये एअरटेल, रिलायन्स जियो, व्होडाफोन आयडिया आणि एमटीएनएल या कंपन्यांचा सहभाग आहे.

हे ही वाचा:

फकिराच्या वेशात दागिने लुबाडणाऱ्याला पकडले

एकनाथ खडसेंच्या जावयाची कोठडी वाढली

राष्ट्रवादी, शिवसेनेला कापरं भरलं म्हणून त्यांनी पाळत ठेवली असावी

महाविकास आघाडीने बनवले महाराष्ट्राला कोरोनाची राजधानी 

या वर्षाच्या सुरुवातीला टेलिकॉम विभागाने टेलिकॉम सर्व्हिस प्रोवाइडर्सला (टीएसपी) भारतामध्ये ५जी टेक्नोलॉजीचा वापर आणि अप्लिकेशनसाठी टेस्टिंगची परवानगी दिली होती. टीएसपीने ओरिजनल डिव्हाइस मेकर्स आणि टेक्नोलॉजी प्रोवाइडर्स एरिक्सन, नोकिया, सॅमसंग आणि सी-डॉटसमवेत करार केला आहे. टेस्टिंग पीरियड अर्थात चाचणीचा कालावधी सध्या ६ महिन्यांचा आहे. यात उपकरणे खरेदी करणे तसेच सेट अप उभारण्यासाठी २ महिन्यांच्या कालावधीचा समावेश आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
285,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा