31 C
Mumbai
Saturday, June 3, 2023
घरविशेषदीड हजार कोटींचे अमली पदार्थ केले नष्ट

दीड हजार कोटींचे अमली पदार्थ केले नष्ट

नवी मुंबईतील तळोजा येथे अमली पदार्थांची विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया पडली पार

Google News Follow

Related

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो, डीआयआर आणि कस्टम विभागाने मुंबईसह राज्यभरात कारवाई करून जप्त करण्यात आलेला दीड हजार कोटी रुपयांचा अमली पदार्थ मुंबई सीमाशुल्क प्रतिबंधक आयुक्तालयाच्या उच्चस्तरीय औषध निर्मूलन समितीच्या उपस्थितीत शुक्रवारी नवी मुंबईतील तळोजा येथे नष्ट करण्यात आला आहे.

नष्ट करण्यात आलेल्या अमली पदार्थामध्ये कोकेन, हेरॉइन, एमडी, गांजा, मेंडरेक्सच्या गोळ्या आणि एमडीएमए या प्रकारचे अमली पदार्थांचा मोठ्या प्रमाणात समावेश होता. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो,डीआयआर आणि मुंबई सीमा शुल्क विभागाने मुंबई सह राज्यभरात हजारों किलोचा अमली पदार्थ जप्त करून अनेक ड्रग्स माफिया, विक्रेते यांच्यावर कारवाई करण्यात आली होती.

मोठ्या प्रमाणात पकडण्यात आलेल्या अमली पदार्थामध्ये कोकेन,हेरॉइन, एमडी, गांजा, मेंडरेक्सच्या गोळ्या आणि एमडीएमए हा अमली पदार्थचा समावेश होता. जप्त करण्यात आलेला अमली पदार्थ मुंबईतील विविध ठिकाणच्या गोदामात ठेवण्यात आला होता.

हे ही वाचा:

कुनो नॅशनल पार्कमध्ये जन्मलेल्या चित्त्याच्या चार बछड्यांपैकी आता एक जिवंत

‘आप’चे नेते सत्येंद्र जैन यांना वैद्यकीय कारणासाठी जामीन

माओवादी झालेली युवती १२वी उत्तीर्ण झाल्यावर होणार पोलिस

संसद भवनाच्या उद्घाटनाविरोधातली याचिका फेटाळत न्यायालयाने ओढले ताशेरे

दरम्यान डीआयआर, एनसीबी, आणि कस्टम विभागाने न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून दीड हजार कोटी रुपयांचा अमली पदार्थ नष्ट करण्यासाठी वित्त मंत्रालय, सरकारच्या निर्देशानुसार मुंबई सीमाशुल्क प्रतिबंधक आयुक्तालयाच्या उच्चस्तरीय औषध निर्मूलन समितीच्या उपस्थितीत शुक्रवारी सकाळी मुंबई वेस्ट मॅनेजमेंटच्या नवीमुंबईतील तळोजा एमआयडीसी या ठिकाणी दीड हजार कोटी किंमतीचा अमली पदार्थाची विल्हेवाट लावण्यात आली. त्यात कोकेन ९किलो ३५ ग्राम कोकेन, १६ किलो ६३३ग्राम हेरॉईन, १९८ किलो एमडी, ३२.९१५किलो गांजा, ८१.९१किलो मेंडरेक्सच्या गोळ्या, एमडीएमच्या २९८गोळ्याचा समावेश होता.

दोन महिन्यापूर्वीच मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने न्यायालयीन प्रक्रियेनंतर मुंबई वेस्ट मॅनेजमेंटच्या नवीमुंबईतील तळोजा येथे २ हजार कोटी रुपये किमतीचा अमली पदार्थ नष्ट केला होता. तसेच डिसेंबर २०२२मध्ये सीमाशुल्क विभागाने आंतरराष्ट्रीय विमानतळ तसेच शहरातील विविध भागातून जप्त करण्यात आलेला ५३८कोटी रुपयांचे अमली पदार्थ तळोजा येथे नष्ट करण्यात आला होता.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,849चाहतेआवड दर्शवा
2,022अनुयायीअनुकरण करा
76,200सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा