28 C
Mumbai
Friday, September 17, 2021
घरविशेषअबब!! एकाच वॉर्डातील कचऱ्याच्या डब्यासाठी दोन कोटी

अबब!! एकाच वॉर्डातील कचऱ्याच्या डब्यासाठी दोन कोटी

Related

मुंबई महापालिकेच्या भायखळा, माझगाव परिसरातील नागरिकांना घरोघरी ओला व सुका कचरा वेगवेगळा जमा करण्यासाठी आणि त्या कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या आदेशाने २२ लीटर क्षमतेचे (११ लीटर ओला कचरा व ११ लीटर सुका कचरा) १० हजार डबे खरेदी करण्यात येणार आहेत. त्याकरता पालिकेने कंत्राटदार मे. पंचरत्न प्लास्टिक या कंत्राटदाराला १ कोटी ८१ लाख ६० हजार रुपये अदा करणार आहे.

एकूणच काय तर, पालिका प्रशासनाची पुन्हा स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रभागावर कृपादृष्टी झाली आहे. लवकरच प्रभागात घरोघरी ओला आणि सुका कचरा स्वतंत्र ठेवण्यासाठी कचऱ्याच्या डब्यांचे वाटप होईल. स्थायी समितीनेही या प्रस्तावाला मंजुरी दिल्यामुळे आता केवळ प्रभाग क्रमांक २०९ मध्ये आता घरोघरी या डब्यांचे वाटप होणार आहे. निविदा प्रक्रियेत प्रथम लघुत्तम ठरलेल्या पंचरत्न प्लास्टिक्सला एक कोटी ८१ लाख ६० हजार रुपयांचे कंत्राट देण्यावर प्रशासनाने शिक्कामोर्तब केले होते. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत सादर करण्यात आला.

या कचरा डब्यांचा पुरवठा करण्यासाठी पालिकेने टेंडरही काढल्यानंतर, केवळ तीन कंत्राटदारांनी प्रतिसाद दिला. सर्वात कमी दरात म्हणजे प्रति कचरा डबा १ हजार ८१६ रुपयेप्रमाणे १० हजार कचरा डबे १ कोटी ८१ लाख ६० हजार रुपये एवढ्या किमतीत कंत्राटदार पुरवठा करणार आहे.

हे ही वाचा:

महाराष्ट्राच्या लोकायुक्त पदी न्यायमूर्ती विद्यासागर कानडे

तालिबानचे करविते ‘धनी’ कोण कोण?

तालिबानी पिलावळीचा धोका…

भारताच्या जीडीपीत होणार वाढ

प्रस्ताव मंजुरीनंतर कार्यादेश कंत्राटदाराला प्राप्त झाल्यावर पुढील ४५ दिवसांत सदर कचरा डब्यांचा पुरवठा करणे हे बंधनकारक आहे. माझगाव परिसरातील स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या प्रभाग क्रमांक २०९ मधील घराघरात प्रत्येकी ११ लिटर क्षमतेचे कचऱ्याचे दोन डबे देण्यात आले आहेत. प्रशासनाने सुमारे १० हजार कचऱ्याच्या डब्यांसाठी दोन कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या डब्यांच्या खरेदीसाठी ई-निविदा मागविण्यात आल्या होत्या.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,408अनुयायीअनुकरण करा
3,030सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा