29.9 C
Mumbai
Friday, June 19, 2026
घरविशेषएका वर्षात अमेझॉनच्या डेटा सेंटर्सनी वापरले ९ अब्ज लिटर पाणी

एका वर्षात अमेझॉनच्या डेटा सेंटर्सनी वापरले ९ अब्ज लिटर पाणी

प्रथमच जलवापराची आकडेवारी सार्वजनिक

Google News Follow

Related

जगभरात वाढणाऱ्या डेटा सेंटर्सची संख्या आणि त्यांचा पर्यावरणावर होणारा परिणाम याबाबत सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर अमेझॉनने प्रथमच आपल्या जलवापराबाबतची आकडेवारी सार्वजनिक केली आहे. कंपनीच्या माहितीनुसार, तिच्या जागतिक डेटा सेंटर संचालनाने २०२५ मध्ये सुमारे २.५ अब्ज गॅलन, म्हणजेच ९ अब्ज लिटरहून अधिक पाण्याचा वापर केला. हा आकडा मोठा वाटत असला तरी, कंपनीचा दावा आहे की तिच्या थेट मालकीच्या आणि संचालनाखालील डेटा सेंटर्समधील पाण्याचा वापर २०२४ च्या तुलनेत २ टक्क्यांनी कमी झाला आहे. विशेष म्हणजे, याच काळात कंपनीने आपल्या डेटा सेंटर नेटवर्कचा विस्तारही केला.

कंपनीने ब्लॉग पोस्टद्वारे ही माहिती जाहीर केली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित डेटा सेंटर्सच्या पर्यावरणीय परिणामांवर जगभरात चर्चा सुरू असताना हा खुलासा करण्यात आला आहे. अमेरिकेतील सिआटेल शहरात अलीकडेच डेटा सेंटर्सवर एक वर्षासाठी तात्पुरती बंदी लागू करण्यात आली होती, ज्याला काही अमेझॉन कर्मचाऱ्यांनी पाठिंबा दिला होता. अमेझॉनने आपल्या ब्लॉगमध्ये मायक्रोसॉफ्ट, गुगल, मेटा यांच्याशी तुलना करत दावा केला की, २०२५ मध्ये त्यांच्या डेटा सेंटर्सनी प्रति किलोवॅट-तास विजेसाठी केवळ ०.१२ लिटर पाण्याचा वापर केला, जो प्रतिस्पर्धी कंपन्यांच्या तुलनेत सर्वात कमी आहे.

मात्र, या तुलनेत काही महत्त्वाचे फरकही आहेत. अमेझॉनचे आकडे संपूर्ण डेटा सेंटर संचालनावर आधारित आहेत, तर गूगलच्या संदर्भातील आकडे केवळ Gemini AI डेटा सेंटर्सच्या जलवापराशी संबंधित असल्याचे सांगितले जाते. उच्च क्षमतेच्या GPU प्रोसेसरमुळे AI डेटा सेंटर्सना पारंपरिक डेटा सेंटर्सपेक्षा अधिक पाण्याची गरज भासते.

हे ही वाचा:

हॉर्मुझ सामुद्रधुनी जवळील १८ हजार भारतीय खलाशांना हाय अलर्ट

होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्यास इराणची तयारी

केईएम रुग्णालय करणार डॉ. सेजल पवारची चौकशी, केले होते आक्षेपार्ह वक्तव्य

NEET च्या उमेदवारांना मिळणार अतिरिक्त १५ मिनिटे

अहवालांनुसार, अमेझॉनकडे जगभरात सुमारे ९२४ डेटा सेंटर्स आहेत. २०२२ मध्ये लीक झालेल्या एका अंतर्गत दस्तावेजानुसार, २०३० पर्यंत कंपनीच्या डेटा सेंटर्सचा वार्षिक जलवापर ७.७ अब्ज गॅलनांपर्यंत पोहोचू शकतो. मात्र, या अहवालांवर कंपनीने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
316,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा