20 C
Mumbai
Monday, January 24, 2022
घरविशेषआंबेडकर द लिजंड मध्ये हा अभिनेता करणार बाबासाहेबांची भूमिका

आंबेडकर द लिजंड मध्ये हा अभिनेता करणार बाबासाहेबांची भूमिका

Related

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारीत एक सिरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिरीजचे नावे ‘आंबेडकर- द लेजेंड’ असे आहे. बाबासाहेब आंबेडकर यांची सिरीज ‘बाबा प्ले’ या ओटीटी प्लॅटफॉर्मरवर प्रदर्शित होणार आहे. या सिरीजची कथा, निर्मिती आणि दिग्दर्शन संजिव जैसवाल यांनी केले आहे. ही सिरीज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यावर आधारीत असणार आहे.

या सिरीजमध्ये अभिनेता विक्रम गोखले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची मुख्य भूमिका साकारणार आहेत. डॉ. बाबा साहेब यांच्या पुण्यतिथी निमित्ताने या सिरीजचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

संजिव जैसवाल यांचेचे ‘फरेब’, ‘अनवर’, ‘शुद्र- द रायझिंग’, ‘प्रणाम’ हे चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले होते. “आपले राष्ट्र हे समानतेकडे वाटचाल करत आहे. कारण या एका व्यक्तीमुळे आपला देश समानतेच्या मार्गावर चालत आहे. अशाच आंबेडकरवादींना हे ओटीटी प्लॅटफॉर्म समर्पित करत आहोत,” असे जैसवाल या सिरीजबद्दल म्हणाले.

हे ही वाचा:

हुतात्मा सहकाऱ्याच्या बहिणीला जवानांनी दिला आशीर्वाद

अंडरवर्ल्ड डॉन सुरेश पुजारीला भारतात आणले

संतापजनक! MPSC ने केली मृत स्वप्निल लोणकरची क्रूर थट्टा

पुण्यात मनसेला धक्का! रुपाली पाटील यांचा राजीनामा

तामिळ सुपरस्टार सूर्याचा ‘जय भीम’ हा चित्रपट २ नोव्हेंबर रोजी अॅमेझॉन प्राईम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती. या सिरीजच्या माध्यमातून लोकांना बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी, त्यांच्या कर्तुत्वाची माहिती मिळणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,588अनुयायीअनुकरण करा
5,780सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा