26 C
Mumbai
Friday, September 29, 2023
घरविशेषअपघातात भारतीय विद्यार्थिनीच्या झालेल्या मृत्युनंतर अमेरिकन पोलिसांनी उडविली खिल्ली

अपघातात भारतीय विद्यार्थिनीच्या झालेल्या मृत्युनंतर अमेरिकन पोलिसांनी उडविली खिल्ली

पोलिसांच्या असंवेदनशीलतेचे घडले दर्शन

Google News Follow

Related

एका वेगवान पोलिस क्रूझरने धडक दिल्याने भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची घटना सिऍटलमध्ये घडली होती. मात्र या दुर्घटनेनंतर एक पोलिस अधिकारी तिच्या मृत्यूबाबत विनोद करत असल्याचे एका ‘बॉडिक्लिप’ कॅमेऱ्यात दिसत आहे. ही क्लिप व्हायरल झाल्यानंतर सिएटलचे कायदे अधिकारी अनेक पोलिस अधिकाऱ्यांसह संघटनेच्या सदस्यांची चौकशी करत आहेत.

 

वॉशिंग्टनच्या नॉर्थईस्टर्न युनिव्हर्सिटीची २३ वर्षीय विद्यार्थिनी जान्हवी कंदुला ही २३ जानेवारी रोजी रात्री पादचारी क्रॉसिंगवरून रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगाने येणाऱ्या पोलिसांच्या गाडीने तिला धडक दिली. या भागात २५ मैल प्रति तास (४० किमी प्रति तास) वेगाची मर्यादा असताना केव्हिन डेव्ह हा पोलिस अधिकारी ७४ मैल प्रति तास (११९ किमी प्रति तास) वेगाने गाडी चालवत होता.

 

 

सिएटल पोलिस ऑफिसर्स गिल्ड (एसपीओजी)चे उपाध्यक्ष आणि पोलिस अधिकारी डॅनियल ऑडेरर हे डेव्हची अमली पदार्थ पडताळणी चाचणी घेण्यासाठी घटनास्थळी जात होते. त्यांनी या घटनेची माहिती एसपीओजीचे अध्यक्ष माईक सोलन यांना दिली.

 

पोलिस क्रूझरवरून केलेल्या त्यांच्या संभाषणाचा काही भाग याप्रमाणे चालला:
‘मला वाटते ती हूडमध्ये होती. ती (गाडीच्या) विंडशील्डला धडकली आणि तेव्हा त्याने ब्रेक मारला आणि गाडीने तिला लांबवर फेकून दिले. परंतु ती मेली आहे… (हसत).
“नाही, ही एक सर्वसाधारण व्यक्ती आहे,” तो पुढे म्हणाला. “हो, केवळ एक चेक लिहा (हसून)… ११००० डॉलर्स… तरीही ती २६ वर्षांची होती… तिचे मूल्य मर्यादित होते.”

 

 

पोलिसांच्या गाडीने धडक दिल्याने विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्यानंतर सिएटल पोलिसांचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. हा अपघात २३ जानेवारी रोजी झाला असला तरी, स्थानिक अधिकाऱ्यांनी ११ सप्टेंबर रोजी या संदर्भातील तपासाची घोषणा केली.

हे ही वाचा:

आधी ‘गदर २’ पाहा तरी…दिग्दर्शकाचा नसिरुद्दीन शहा यांना सल्ला

मराठा समाजाला एकनाथ शिंदे न्याय देऊ शकतात!

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस घेतले, जरांगेंचे उपोषण मागे

छत्रपती शिवाजी महाराजांची ‘वाघनखे’ देशभरातील पाच शहरांत प्रदर्शित करणार

 

सिएटल पोलिस ऑफिसर्स गिल्डचे उपाध्यक्ष डॅनियल ऑडरर यांनी हे संभाषण ‘खासगी’ असल्याचा दावा केला. तसेच, त्यांनी ‘अनवधानाने’ गाडीमध्ये कॅमेरा विसरल्याचे त्यांनी सांगितले. स्थानिक माध्यमांच्या म्हणण्यानुसार, ‘जेव्हा त्याला अपूर्ण संभाषणाने चुकीचा संदेश पसरेल, असे लक्षात आल्याने त्याने ऑफिस ऑफ पोलिस अकाउंटेबिलिटी विभागाकडे स्वत:हून या घटनेची तक्रार केली. परंतु ११ सप्टेंबर रोजी यूट्यूबवर फुटेज टाकणाऱ्या सिएटल पोलिसांनी या व्हीडिओचे गांभीर्य ओळखून हे प्रकरण वरिष्ठ विभागाकडे पाठवले. ऑडररचे संभाषण कठोर आणि असंवेदनशील असून त्यात खोटारडेपणा ठासून भरला आहे. तो पीडितेचे वय २६ असल्याचे सांगतो. परंतु ती २३ वर्षांची आहे. तसेच, चालक पोलिस अधिकारी डेव्ह ५० मैल ताशी वेगाने गाडी चालवत होता, असे तो सांगतो. प्रशिक्षित चालकासाठी हा वेग नियंत्रणाबाहेर नाही, असे नमूद करतो. मात्र प्रत्यक्षात तेव्हा डेव्ह ७४ मैल प्रति तास वेगाने गाडी चालवत होता.

 

 

ऑडररने या संदर्भात एक लेखी निवेदन दिले आहे. त्यात त्याने ‘संभाषणातील माझी बाजू ऐकून मानवी मृत्यूबद्दल मी असंवेदनशील आहे, यावर कोणाचाही विश्वास बसेल. परंतु ती टिप्पणी चुकीच्या भावनेने किंवा कठोर मनाने केलेली नव्हती,’ असे त्याने निवेदनात नमूद केले आहे. सॅन फ्रान्सिस्को येथील भारतीय वाणिज्य दूतावासाने या प्रकरणातील सहभागींची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,844चाहतेआवड दर्शवा
2,034अनुयायीअनुकरण करा
101,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा