35 C
Mumbai
Friday, May 17, 2024
घरविशेषआसाम युवक कॉंग्रेसच्या अंकिता दत्ता भाजपमध्ये प्रवेश करणार

आसाम युवक कॉंग्रेसच्या अंकिता दत्ता भाजपमध्ये प्रवेश करणार

Google News Follow

Related

आसाम युवक काँग्रेसच्या माजी अध्यक्षा अंकिता दत्ता या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांनी स्वतःच या वृत्ताला दुजोरा दिला आहे. दत्ता यांनी युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास बीव्ही यांच्या विरोधात तक्रार दाखल केल्यानंतर आणि त्यांच्यावर छळवणूक केल्याचा आरोप केल्यानंतर त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आले. आसाम काँग्रेसचे माजी अध्यक्ष दिवंगत अंजन दत्ता यांच्या त्या कन्या आहेत. गुवाहाटीमध्ये दत्ता यांचे १०० पेक्षा अधिक समर्थक त्यांच्यासोबत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा हे याबाबत म्हणाले की. भाजप हा प्रतिभावान तरुणांचे पक्षात स्वागत करतो. डॉक्टर, अभियंते, आयटी व्यावसायिक आणि इतर क्षेत्रातील शिक्षित तरुणांनी आमच्या पक्षात सामील व्हायचे आहे. आम्ही अनेक विकास योजना राबवत आहोत. या योजनेची कार्यक्षमतेने अंमलबजावणी करण्यासाठी असे युवक मदत करतील याची आम्हाला खात्री आहे.  एप्रिल २०२३ मध्ये दत्ता यांनी आसाम पोलिसांकडे श्रीनिवासविरुद्ध छळवणूक आणि भेदभाव केल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली होती. तिच्या तक्रारीवरून श्रीनिवास यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. मे 2023 मध्ये, श्रीनिवास यांना सर्वोच्च न्यायालयाने अटकेतून अंतरिम दिलासा दिला. त्यावेळी काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी दत्ता यांच्यावर मुख्यमंत्री सरमा यांच्या प्रभावाखाली तक्रार दाखल केल्याचा आरोप केला होता.

हेही वाचा..

हिंदी राष्ट्रभाषा नाही, मराठी सर्व शाळांत अनिवार्य करा!

‘त्या’ वाजुखाना परिसरात शिवलिंगाची पूजा करण्याची परवानगी द्यावी

हुती दहशतवाद्यांकडून मालवाहू जहाजावर क्षेपणास्त्रहल्ला!

रोहन बोपण्णाने ग्रँडस्लॅमसह अनोख्या विक्रमाला घातली गवसणी

भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान दत्ता यांनी “न्याय” मिळवण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, पक्षाने त्यांना भेटू दिले नाही. त्या म्हणाल्या, फक्त माझाच नाही तर राहुल गांधींनी त्यांच्या यात्रेत बैठक नाकारून तळागाळातील कार्यकर्त्यांचा अपमान केला आहे. त्या म्हणाल्या, मला न्याय न देता पक्षातून काढून टाकण्यात आले. याबद्दल वरिष्ठ नेत्यांकडून केवळ यावर प्रतिसाद मिळण्यासाठी १० महिन्यांहून अधिक काळ प्रतीक्षा करावी लागली. राहुल गांधी यांनी मला भेटण्यास नकार दिल्याने मला खूप वाईट वाटले. याशिवाय दत्ता म्हणाल्या, मी भाजपकडून काहीही अपेक्षा करणार नाही. आपल्यासाठी आवाज उठवल्याबद्दल मुख्यमंत्री  सरमा यांचे त्यांनी कौतुक केले. जेव्हा मला त्रास होत होता आणि त्याविरुद्ध बोलले तेव्हा संपूर्ण काँग्रेस नेतृत्व मौन बाळगून होते. त्या वेळी सरमा हे वेगळ्या पक्षाचे असून देखील ते माझ्या पाठीशी उभे राहिले. काँग्रेस पक्षाच्या माजी मंत्री बिस्मिता गोगोई यांचाही भाजपमध्ये प्रवेश होण्याची शक्यता आहे. गोगोई हे आसाममधील माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांच्या मंत्रिमंडळात वस्त्रोद्योग मंत्री होते.

कोण आहे अंकिता दत्ता?

अंकिता दत्ता या आसाम युवक काँग्रेसच्या प्रमुख होत्या. त्या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिवंगत अंजन दत्ता यांच्या कन्या आहेत. त्यांनी गोगोई सरकारमध्ये मंत्री म्हणून काम केले होते. तसेच प्रदेश काँग्रेसचे नेतृत्व केले होते. २२ एप्रिल २०२३ रोजी काँग्रेस पक्षाने आसाम प्रदेश युवक काँग्रेसच्या तत्कालीन अध्यक्षा  अंकिता दत्ता यांची पक्षविरोधी कारवायांसाठी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वातून सहा वर्षांसाठी हकालपट्टी केली होती. १८ एप्रिल २०२३ रोजी अंकिता दत्ताने यांनी अनेक ट्विट केले होते. त्यामध्ये त्यांनी काँग्रेस नेते श्रीनिवास बीव्ही यांच्याकडून छळवणूक केल्याबद्दल जाहीरपणे सांगितले होते. याशिवाय काँग्रेसच्या हायकमांडवर दत्ता यांच्या प्रकरणात स्वारस्य नसल्याचा आरोपही केला होता.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
153,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा