26 C
Mumbai
Monday, February 26, 2024
घरविशेष‘त्या’ वाजुखाना परिसरात शिवलिंगाची पूजा करण्याची परवानगी द्यावी

‘त्या’ वाजुखाना परिसरात शिवलिंगाची पूजा करण्याची परवानगी द्यावी

विहिंपचे अध्यक्ष आलोक कुमार यांची मागणी

Google News Follow

Related

भारतीय पुरातत्व सर्वेक्षण अहवालानुसार ज्ञानवापीच्या जागेवर हिंदू मंदिर अस्तित्वात होते. वादग्रस्त संरचनेच्या तथाकथित वजूखाना परिसरात शिवलिंगाची सेवापुजा करण्यासाठी हिंदुना परवानगी द्यावी, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने शनिवारी केली. ज्ञानवापी मशीद अन्य योग्य ठिकाणी हलवण्यास आणि कशी विश्वनाथाची मूळ जागा हस्तांतरित करण्यास इंतेजामिया समितीला सांगावे, असे केल्यास भारतातील दोन प्रमुख समुदायांमध्ये सौहार्दपूर्ण संबंध निर्माण करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरेल, असा विश्वास विहिंपचे अध्यक्ष आलोक कुमार यांनी एका निवेदनात म्हटले आहे.

कुमार म्हणाले,  मंदिराच्या संरचनेचा एक भाग, विशेषतः पश्चिम भिंत हा हिंदू मंदिराचा उर्वरित भाग आहे.एएसआयच्या अहवालात असेही दिसून आले आहे की पूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या मंदिराचे घटक, यामध्ये खांब दिसून आलेले आहेत. २०२२ मध्ये वादग्रस्त जागेत ‘वुझुखाना’ मध्ये सापडलेल्या शिवलिंगाविषयी बोलताना आलोक कुमार म्हणाले की, संरचनेत सापडलेल्या शिलालेखांमध्ये जनार्दन, रुद्र आणि उमेश्वर या नावांचा शोध हे मंदिर असल्याचा पुरावा आहे.

हेही वाचा..

‘आयपीएस अधिकाऱ्या’ने केलेल्या कृतीमुळे त्याचे बिंग फुटले

रोहन बोपण्णाने ग्रँडस्लॅमसह अनोख्या विक्रमाला घातली गवसणी

हुती दहशतवाद्यांकडून मालवाहू जहाजावर क्षेपणास्त्रहल्ला!

दिल्ली: जागरण कार्यक्रमादरम्यान स्टेज कोसळला, एकाचा मृत्यू तर १७ जखमी!

काय आहे ज्ञानवापीचा वाद…

अनेक दशकांपूर्वीचा आहे. तथापि, २०२१ मध्ये राखी सिंग, लक्ष्मी देवी, सीता साहू, मंजू व्यास आणि रेखा पाठक या पाच महिलांनी मां शृंगार गौरी स्थळावर पूजा करण्याच्या अधिकारासाठी स्थानिक न्यायालयात याचिका केली होती. एप्रिल २०२२ मध्ये स्थानिक न्यायालयाने सर्वेक्षणाचे आदेश दिले होते.

मे २०२२ मध्ये सर्वेक्षणाचा निष्कर्ष काढण्यात आला. त्यात तिथे शिवलिंग सापडल्याचे सांगण्यात आले. मुस्लीम समाजाच्या पक्षाने हा दावा नाकारला तिथे शिवलिंग नसून कारंजा असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यानंतर न्यायालयाने या संकुलातील सुरक्षा व्यवस्था कडक केली आणि वादग्रस्त संरचनेतील वुझुखाना परिसर सील करण्याचे आदेश दिले. २०२३ मध्ये वाराणसी जिल्हा न्यायालयाने एएसआयद्वारे संरचनेचे सखोल सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते. तिथे वैज्ञानिक तपासणी आवश्यक असल्याचे म्हटले होते.

एएसआयचा अहवाल काय आहे…

भारतीय पुरातत्व सर्वेक्षणच्या ज्ञानवापी संरचनेवर २५ जानेवारी रोजी प्रसिद्ध झालेल्या अहवालाने हे स्पष्ट केले आहे की भूतकाळात तिथे एक मोठे हिंदू मंदिर अस्तित्वात होते. ८०० पेक्षा जास्त पानांच्या अहवालात रचना आणि त्यात सापडलेल्या कलाकृतींचे तपशीलवार वर्णन करण्यात आले आहे. अहवालात शिवलिंग, देवतांची शिल्पे असलेले छोटे  मंदिर, विष्णू, कृष्ण आणि गणेश यांसारख्या हिंदू देवतांच्या मूर्ती या संरचनेच्या एस१, एस२, आणि एस३ या तळघरांमध्ये पुरलेल्या कलाकृतींचा तपशील आहे. हे तळघर जाणीवपूर्वक भंगार टाकून अडवल्याचे आढळून आले. हे ठिकाण पूर्वी मशिदीत रूपांतरित झालेले मंदिर होते, असे निष्कर्षावरून दिसून येते.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
131,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा