28.7 C
Mumbai
Wednesday, October 28, 2026
घरविशेषमंत्रालयातील सुरक्षा जाळीवर पुन्हा एका व्यक्तीने मारली उडी, पोलिसांची दाणादाण!

मंत्रालयातील सुरक्षा जाळीवर पुन्हा एका व्यक्तीने मारली उडी, पोलिसांची दाणादाण!

पोलिसांकडून अटक

Google News Follow

मंत्रालयातून एक मोठी बातमी समोर आली आहे.मंत्रालयातील सुरक्षा जाळीवर पुन्हा एका व्यक्तीने उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे.या घटनेनंतर मंत्रालय परिसरात एकच खळबळ उडाली.दरम्यान, आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.

मंत्रालयाच्या इमारतीवरून आतील बाजूस कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी संरक्षण जाळी लावण्यात आली आहे.विविध मागण्या-समस्या मांडण्यासाठी राज्यातील अनेक नागरिक मंत्रालयात येत असतात.यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ही संरक्षण जाळी लावण्यात आली आहे.मात्र, त्यांनतर सुद्धा अनेक लोक जाळीवर उड्या मारून आंदोलन-आत्महत्येचा प्रयत्न करत असतात.आज पुन्हा एकदा एका व्यक्तीने संरक्षण जाळीवर उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.संरक्षण जाळीवर उडी मारणाऱ्या व्यक्तीबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. तसेच कशाकरिता हे कृत्य केलं याचीही माहिती समोर आलेली नाही.

हे ही वाचा:

मै नरेंद्र दामोदरदास मोदी… ९ जून रोजी सायंकाळी तिसऱ्यांदा गुंजणार आवाज!

महायुतीचे विसर्जन, पुनर्रचना की मजबुतीकरण?

दहशतवादाच्या आरोपाखाली तुरुंगात असलेले अमृतपाल, शेख रशीद निवडून आलेत, पुढे काय?

विरोधकांना आता पाच वर्षं देव पाण्यात घालूनच बसायचं आहे!

जाळीवर उडी मारणाऱ्या व्यक्तीच्या हातामध्ये एक बॉटल देखील असल्याची माहिती असून त्यामध्ये विष असल्याची माहिती आहे.या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून मरीन ड्राइव्ह पोलीस स्टेशनमध्ये त्याला घेऊन गेले आहेत.या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहेत.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा