35 C
Mumbai
Friday, April 26, 2024
घरविशेष'शनय सेंटर हे स्वमग्न मुलांचे प्रश्न सोडविण्यासाठी सर्वार्थाने उपयुक्त'

‘शनय सेंटर हे स्वमग्न मुलांचे प्रश्न सोडविण्यासाठी सर्वार्थाने उपयुक्त’

Google News Follow

Related

पनवेल येथे आमदार अतुल भातखळकर यांच्या हस्ते उद्घाटन

‘सोपान संस्थेच्या माध्यमातून शनय ऑटिझम सेंटरच्या रूपात एक सुसज्ज असे सेंटर इथे उभे राहिले आहे ही आनंदाची बाब आहे. मी या संस्थेशी निगडित आहे. दिव्यांगांचे प्रश्न, ऑटिझमच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी खूप काही करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी येत्या काळात आम्ही काम करू. या परिसरात राहणारे जे दिव्यांग विद्यार्थी असतील त्यांना या सेंटरचा उपयोग होईल,’ अशा शब्दांत भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी या सेंटरचे महत्त्व विषद केले. नवीन पनवेल येथे या ऑटिझम सेंटरचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते.

स्वमग्न (ऑटिझम) मुलांना सक्षम करण्याच्या ‘सोपान’ या संस्थेच्या वाटचालीतील महत्त्वाचा टप्पा म्हणून उभारण्यात आलेल्या शनय ऑटिझम रिसोर्स सेंटर या नव्या केंद्राचे उद्घाटन रविवारी झाले. खांदा कॉलनी, नवीन पनवेल येथे हे केंद्र उभे राहिले आहे. त्यावेळी भाजपाचे पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर हेदेखील उपस्थित होते.

अतुल भातखळकर म्हणाले की, या सेंटरचे वैशिष्ट्य आहे ते हे की या ठिकाणी ऑटिझमच्या मुलांना दोन-तीन दिवस राहण्याची व्यवस्था केली आहे. येणाऱ्या काळात बीएडचा जो कोर्स आहे. २०१५ आपण हा कोर्स सुरू केला होता. तोही या सेंटरला शिफ्ट होईल. त्यामुळे अनेक मुले याला प्रवेश घेतील अशी आशा करुया.

पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, ऑटिझमची ही व्याधी ज्यांच्यात आहे त्यांच्या पालकांना प्रशिक्षण देणं, सामान्य जीवन जगण्यासाठी त्यांना आधार देणं यासाठी ही संस्था मदत करेल. आमच्याकडून या संस्थेसाठी सर्वप्रकारची मदत केली जाईल.

हे ही वाचा:

…आणि डॉलरऐवजी त्याला मिळाले कागदाचे तुकडे !

लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांच्या तोंडाला काळे फासले

शिवमंदिर हटविल्यामुळे स्थानिकांमध्ये नाराजी

कसली स्टँड अप कॉमेडी, हा तर अजेंडा

सोपान संस्थेच्या विश्वस्त रुबिना लाल, शोभा श्रीवास्तव, व्यवस्थापकीय विश्वस्त संगीता मेहता, कोटक महिंद्र बँकेच्या सीआरएस विभागाचे उपाध्यक्ष हिमांशू निमसरकर यावेळी उपस्थित होते.

कोटक महिंद्र बँकेच्या अनुदानातून बांधलेले आणि सुसज्ज असेल शनय सेंटर आंतरराष्ट्रीय मानकांनुसार नियोजित व डिझाईन केले गेले आहे. शनय ऑटिझम रिसोर्स सेंटर हे स्वमग्न असलेल्या व्यक्तींनी सक्षम करण्याच्या सोपान संस्थेच्या प्रवासातील मैलाचा दगड आहे. या सेंटरच्या माध्यमातून स्वमग्न मुलांसाठी स्वमग्नता हस्तक्षेप व डे स्कूल सेवा प्रदान करणार आहे. शनयमध्ये पालकांना त्यांच्या विशेष गरजा असलेल्या मुलांची काळजी घेण्यापासून आराम देण्यासाठी तात्पुरती निवासी सुविधा समाविष्ट आहे.

‘सोपान’ ही संस्था २००२मध्ये स्वमग्न मुलांसाठी व त्यांच्या पालकांना आधार देण्यासाठी उभी राहिली. स्वमग्नतेसाठी समर्पण केंद्र २००३मध्ये उभे राहिले. अशा मुलांकडे संपूर्ण लक्ष या माध्यमातून दिले गेले. त्यानंतर २०१०मध्ये जोगेश्वरी येथे मुंबई महानगरपालिकेने अशा मुलांसाठी जागा उपलब्ध करून दिली तिथे अशी स्वमग्नता असलेली मुले शिक्षण घेतात. स्पंदन या संस्थेच्या माध्यमातून अशा मुलांसाठी मोफत उपचार तसेच समुपदेशन केले जाते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा