बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने भारतीय सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांप्रती, विशेषतः त्यांना वाढवणाऱ्या मातांप्रती कृतज्ञता आणि आदर व्यक्त केला आहे. अभिनेत्रीने आपल्या इन्स्टाग्रामवर एक भावनिक नोट शेअर करत गेल्या काही दिवसांच्या भावनांना शब्दांत मांडले. अलिया म्हणाली, “गेल्या काही रात्री… वेगळ्या वाटत आहेत. जेव्हा एक संपूर्ण देश आपला श्वास रोखून उभा असतो, तेव्हा हवेत एक स्थिर शांतता जाणवते. आपणही ही स्थिरता अनुभवली आहे.
तिने आपल्या पोस्टमध्ये आपल्या सुरक्षेसाठी आणि रक्षणासाठी सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांच्या समर्पण आणि बलिदानावर प्रकाश टाकला. आलिया म्हणाली, “आपण हे जाणलं आहे की कुठेतरी त्या पर्वतात आपले सैनिक जागे आहेत, सतर्क आहेत आणि धोक्यात आहेत. जेव्हा आपण आपल्या घरी सुरक्षित झोपतो, तेव्हा कुठेतरी काही पुरुष आणि महिला अंधारात उभे राहून आपल्या झोपेचं रक्षण करत असतात, आपल्या जीवाची किंमत देत असतात. सैनिकांचं समर्पण हे केवळ शौर्याचं प्रतीक नाही, तर ते त्याहूनही अधिक आहे. ते संघर्ष, बलिदान आणि देशाप्रती निष्ठेचं प्रतीक आहे.
हेही वाचा..
उडण्यापूर्वी भारताने ‘उडवले’ पाकिस्तानचे जेएफ-१७ लढाऊ विमान!
भारताने डब्ल्यूटीओला टॅरिफ योजनेची दिली माहिती
आदमपूरमध्ये मोदींनी पाकड्यांच्या दाव्याची केली पोलखोल
ती पुढे म्हणाली, “सैनिकांच्या बलिदानामागे फक्त त्यांचं धैर्य आणि संघर्ष नसतो, तर त्यांच्या मातांचंही धैर्य असतं. प्रत्येक वर्दीच्या मागे एक आई असते, जी कधीही झोपलेली नसते. एक आई… जिला माहिती असतं की तिचं मूल लोरींच्या रात्रीत नाही, तर धोक्यांनी भरलेल्या रात्रीत आहे. एक तणाव आहे, एक अशी शांतता आहे, जी कधीही तुटू शकते. अलियाने मदर्स डेच्या निमित्ताने सैनिकांच्या मातांना वंदन केलं, ज्या आपल्या मुलांच्या बलिदानावर अपार शक्ती आणि अभिमान दाखवतात.
ती म्हणाली, “रविवारी आपण मदर्स डे साजरा करत होतो. त्या दिवशी मी स्वतःला त्या मातांविषयी विचार करण्यापासून रोखू शकले नाही, ज्यांनी अशा वीरांना जन्म दिला, त्यांना वाढवलं आणि स्वतःमध्ये ती ताकद कायम ठेवली. अलियाने शहीद सैनिकांना श्रद्धांजली अर्पण केली. ती म्हणाली, “आपण त्या वीरांसाठी शोक व्यक्त करतो, जे कधीच परत येणार नाहीत, पण त्यांचं बलिदान आणि त्याचं नाव देशाच्या हृदयात आणि आत्म्यात कायम राहील. त्यांचं योगदान कधीही विसरलं जाणार नाही.
