पाकिस्तानच्या ‘जेएफ-१७’ लढाऊ विमान पाडल्याच्या भारताच्या दाव्याला पुष्टी मिळतेय. भारताच्या कारवाईत ११ पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू झाला असून त्यांची नावे जाहीर झाली आहेत. पाकिस्तानचे स्क्वाड्रन लीडर उस्मान युसुफ यांचाही कारवाईत मृत्यू झाला आहे. यांच्यासह पाच पाकिस्तानी वायुदलाचे सैनिक मृत्यूमुखी पडले आहेत. स्क्वाड्रन लीडर उस्मान युसुफ हे जेएफ-१७ लढाऊ विमानाचे वैमानिक होते. जकोबाबाद हवाईतळावरील भारताच्या हवाई हल्ल्यात युसुफ मृत्युमुखी पडले.
पाकिस्तानच्या आकाशवाहिनीने आणि सरकारने दिलेल्या माहितीनुसार, जकोबाबाद हवाईतळावरून जेएफ-१७ लढाऊ विमान उड्डाण भरण्याच्या तयारीत असताना भारताच्या झालेल्या हल्ल्यात स्क्वाड्रन लीडर उस्मान युसुफ यांच्यासह पाच हवाई दलाच्या सैनिकांचा मृत्यू झाला. दरम्यान, कारवाईत पाकचे किमान ८० सैनिक मृत्यूमुखी पडल्याचा अंदाजित दावा भारताने केला आहे. मात्र, भारताच्या हल्ल्यात ११ जवानांचा मृत्यू झाल्याचे पाकने मान्य केले. त्या जवानांची नावे पाकने जाहीर केली आहेत.
दरम्यान, भारताच्या हवाई दलाने किती यशस्वीपणे कारवाई केली हे यामधून समोर दिसून येते. कारण, पाकच्या लढाऊ विमानांना उड्डाण देखील भरू दिले नाही, विमाने जमिनीवर असतानाच भारताने हल्लाकरून ती नष्ट करून टाकलीत. त्यामुळे भारतीय हवाई दलाच्या शौर्यावर आणि पराक्रमावर प्रश्न उपस्थित करण्यापूर्वी आता जगाला विचार करावा लागेल. पाकिस्तानने कितीही नावे आणि आकडेवारी लपविली तरी एक ना एक दिवस ती समोर येतीलच.
हे ही वाचा :
भारताने डब्ल्यूटीओला टॅरिफ योजनेची दिली माहिती
आदमपूरमध्ये मोदींनी पाकड्यांच्या दाव्याची केली पोलखोल
भारताच्या अटी मोदींनी जगासमोर स्पष्ट केल्या!
पाकिस्तानशी संबंध असलेल्या मौलानाच्या मदरशावर बुलडोझर कारवाई
दरम्यान, भारत-पाकमध्ये युद्धबंदी झाली असली तरी दहशतवाद विरोधी कारवाई सुरूच राहणार असल्याचे भारताने स्पष्ट केले आहे. असे असताना नुकतीच एक दहशतवाद विरोधी कारवाईची बातमी समोर आली आहे. जम्मू-काश्मीरच्या शोपियामध्ये सुरक्षादल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु झाली आहे. या चकमकीत सुरक्षा दलाने तीन दहशतवाद्यांना ठार केले आहे. सुरक्षा दलाची परिसरात चकमक सुरूच आहे.
