गुजरातच्या अमरेली जिल्ह्यात एका मौलानाचे पाकिस्तानी संबंध उघडकीस आल्यानंतर मोठी कारवाई करण्यात आली आहे. मौलाना मोहम्मद फजल अब्दुल अजीज शेख यांच्यावर कारवाई करत त्यांच्या मदरशावर प्रशासनाने बुलडोझर चालवून इमारत जमीनदोस्त केली आहे. मौलानाच्या फोनमध्ये पाकिस्तानी संबंध असलेले अनेक व्हॉट्सअप ग्रुप आढळून आल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.
संबंधित घटना अमरेली जिल्ह्यातील धारी परिसरातील हीमखडिपारा भागातील आहे. माहितीनुसार, मोहम्मद फजल अब्दुल अजीज शेख चालवत असलेला मदरसा ज्या जागेवर उभारण्यात आला होता, ती जागा सरकारने गरीब लाभार्थ्यांना वाटप केली होती. त्याच जमिनीवर हा मदरसा उभारण्यात आला होता. दरम्यान, पोलिस तपासात मौलानाच्या व्हॉट्सअपमध्ये पाकिस्तानशी संबंधित अनेक व्हॉट्सअप ग्रुप्स आढळून आले होते. या संशयास्पद घडामोडी लक्षात घेता एसपी आणि कलेक्टर यांच्या स्वतंत्र पथकांनी मदरशाची चौकशी सुरू केली होती. त्यानंतर प्रशासनाने मोठी कारवाई करत मदरशाचे बांधकाम पाडले आहे.
डिप्टी एसपी पी. आर. राठोड यांनी सांगितले की, धारी भागात एक मदरसा चालवला जात होता आणि तपासादरम्यान मौलाना मदरशाशी संबंधित कोणतीही कागदपत्रे सादर करू शकले नाहीत, ज्यामुळे हे सिद्ध होईल की मदरसा त्यांचाच आहे. त्यानंतर प्रशासनाने मदरशाचे बांधकाम पाडण्याचे आदेश दिले आणि ती कारवाई सध्या सुरू आहे. त्यांनी सांगितले की, घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून सध्या कायदा व सुव्यवस्थेची कोणतीही समस्या नाही. मात्र, अशा प्रकारची परिस्थिती उद्भवल्यास कठोर कारवाई केली जाईल.
हेही वाचा..
जम्मू- काश्मीरच्या शोपियानमध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा
पहलगामच्या दहशतवाद्यांचे पोस्टर जाहीर
पहलगामच्या दहशतवाद्यांचे पोस्टर जाहीर
अमेरिकेने इराणवर कोणते नवे निर्बंध लादले?
प्रांतीय अधिकारी हर्षवर्धनसिंह जडेजा यांनी सांगितले की, धारी भागात ज्या जागेवर मदरसा चालवला जात होता, ती जागा गरीब लाभार्थ्यांसाठी वाटप करण्यात आलेली होती. चौकशीनंतर त्या जागेवरील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली.
