जम्मू- काश्मीरच्या शोपियानमध्ये मंगळवार, १३ मे रोजी सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात चकमक झाल्याची माहिती समोर आली आहे. या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलांना यश आले आहे. परिसरात शोध महीम सुरू आहे. यापूर्वी चकमकीदरम्यान दहशतवादी सुरक्षा दलांच्या घेराबंदीमध्ये अडकले होते.
शोपियानच्या शुक्रू केलर भागात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये मंगळवारी चकमक झाली. सोमवारी रात्री सुरक्षा दलाला या परिसरात दहशतवादी असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. याचं माहितीनंतर सुरक्षा दलाने मोहीम हाती घेतली होती. या चकमकीत लष्कर-ए-तोयबाचे तीन दहशतवादी ठार झाले आहेत, अशी माहिती समोर आली आहे. ठार झालेले दोन दहशतवादी हे कमांडर असल्याची माहिती समोर आली आहे. या तीन जणांचे मृतदेह सुरक्षा दलाने ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून AK-47 जप्त करण्यात आल्या आहेत. ठार झालेले दहशतवादी हे पहलगाम हल्ल्यातील सहभागी दहशतवादी आहेत का याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही.
VIDEO | Encounter breaks out between security forces and terrorists in Shopian district of Jammu and Kashmir.
Based on a specific input about the presence of terrorists in Shukroo Keller area of the south Kashmir district, security forces launched a cordon and search operation… pic.twitter.com/qfPsSVbK2T
— Press Trust of India (@PTI_News) May 13, 2025
हे ही वाचा :
ऑपरेशन सिंदूरच्या काळात भारतावर १५ लाख सायबर हल्ले; ‘या’ देशांमधून हॅकर्स कार्यरत
बेपत्ता पद्मश्री सन्मानित डॉ. सुब्बाना अय्यप्पन यांचा मृतदेह कावेरी नदीत आढळला
अमृतसरमध्ये विषारी दारू पिऊन १४ जणांचा मृत्यू; दारू पुरवठा करणाऱ्यासह चौघांना अटक
सुरक्षेच्या कारणास्तव एअर इंडिया, इंडिगोकडून ‘या’ शहरांना जाणारी उड्डाणे रद्द
२२ एप्रिल रोजी पहलगाम दहशतवादी हल्ल्यात सामील असलेले तीन पाकिस्तान समर्थित दहशतवादी आदिल हुसेन ठोकर, अली भाई आणि हाशिम मुसा यांचे पोस्टर्स लावण्यात आले होते. तसेच माहिती देणाऱ्याला बक्षीसही जाहीर करण्यात आले होते. यानंतर काही वेळातच ही घटना घडली. पहलगाम हल्ल्याच्या काही दिवसांनंतर, जम्मू आणि काश्मीरच्या अधिकाऱ्यांनी २५ एप्रिल रोजी बिजबेहरा येथील ठोकर यांचे निवासस्थान आयईडी वापरून उडवून दिले. ठोकर याने पाकिस्तानी दहशतवाद्यांना पहलगाममध्ये हल्ला करण्यास मदत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचे मानले जाते.
