पंजाबच्या अमृतसरमधील गावात विषारी दारू पिऊन काहींचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. अमृतसरमधील मजिठा येथे विषारी दारू प्यायल्याने १४ जणांचा मृत्यू झाला तर सहा जणांची प्रकृती गंभीर आहे. एसएसपी अमृतसर (ग्रामीण) मनिंदर सिंग यांनी मृतांच्या संख्येची पुष्टी केली आहे. या प्रकरणात विषारी दारूचा पुरवठा करणाऱ्या चार जणांना अटक केली असून मुख्य पुरवठा करणाऱ्याचे नाव नाव प्रभजीत सिंग असे आहे.
एसएसपी अमृतसर (ग्रामीण) मनिंदर सिंग म्हणाले की, “आम्हाला काल रात्री ९.३० च्या सुमारास माहिती मिळाली की बनावट दारू पिऊन लोक मरत आहेत. त्यानंतर आम्ही तात्काळ कारवाई केली आणि चार जणांना अटक केली आहे. आम्ही मुख्य पुरवठादार प्रभजीत सिंगला अटक केली आहे,” असे अमृतसरचे एसएसपी मनिंदर सिंग म्हणाले. प्रभजीत सिंगने चौकशीदरम्यान किंगपिन पुरवठादार साहब सिंगचे नाव उघड केले आहे. त्यानंतर त्यालाही अटक करण्यात आली असून त्याने कोणत्या कंपन्यांकडून ही दारू खरेदी केली आहे याचा तपास केला जात आहे.
#WATCH | Punjab: 14 people dead and 6 hospitalised after allegedly consuming spurious liquor in Amritsar's Majitha
SSP Amritsar Rural Maninder Singh says," Four local suppliers arrested yesterday revealed the name of a liquor supplier named Prabhjeet. This man told us about a… pic.twitter.com/PQ4B0rHHmd
— ANI (@ANI) May 13, 2025
पंजाब सरकारकडून बनावट दारूच्या पुरवठादारांवर कडक कारवाई करण्याचे कडक निर्देश आम्हाला मिळाले आहेत. छापे टाकले जात आहेत आणि लवकरच उत्पादकांना अटक केली जाईल. दोन एफआयआर नोंदवण्यात आले आहेत. नागरी प्रशासन देखील यात सहभागी आहे आणि आम्ही घरोघरी जाऊन दारू पिलेल्यांची ओळख पटवत आहोत, जेणेकरून अधिक जीवितहानी टाळता येईल. या घटनेचा परिणाम पाच गावांवर झाला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
हे ही वाचा:
सेनादलांचे स्पष्ट संकेत, दु:साहस केलेत तर तांडव होणार…
काँग्रेसला ‘देशद्रोह्यांची पार्टी’ कोणी म्हटले ?
कोहलीच्या टेस्ट संन्यासावर क्रिकेटविश्व भावूक
अमेरिका, चीनमधील टॅरिफ वॉर ९० दिवसांसाठी स्थगित
पंजाब सरकारने अमृतसरच्या मजिठा येथे बनावट दारू रॅकेटविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. मुख्य आरोपी प्रभजीत सिंग याला अटक करण्यात आली आहे आणि बनावट दारू पुरवठा नेटवर्कचा सूत्रधार म्हणून त्याची ओळख पटवण्यात आली आहे. एसएसपी अमृतसर ग्रामीण यांनी अटकेची पुष्टी केली आहे. बीएनएसच्या कलम १०५ आणि उत्पादन शुल्क कायद्याच्या कलम ६१अ अंतर्गत एफआयआर (क्रमांक ४२, दिनांक १३/५/२५) नोंदवण्यात आला आहे. कुलबीर सिंग उर्फ जग्गू, मुख्य आरोपी प्रभजीत सिंग याचा भाऊ, साहिब सिंग उर्फ सराय, गुरजंत सिंग, निंदर कौर यांनाही अटक करण्यात आली आहे.
