29 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
घरविशेष‘बेस्ट’ला महाराष्ट्र बंदचा बसला दोन कोटींचा फटका!

‘बेस्ट’ला महाराष्ट्र बंदचा बसला दोन कोटींचा फटका!

Google News Follow

Related

लखीमपूर हिंसाचाराच्या निषेधार्थ महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारने सोमवारी (११ ऑक्टोबर) महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. कोरोना काळात विस्कळीत झालेली आर्थिक घडी आता कुठे सुरळीत होऊ पाहत असताना या निर्णयामुळे सर्वच क्षेत्रांना पुन्हा आर्थिक फटका बसला आहे. मुंबईची दुसरी जीवनवाहिनी असलेली ‘बेस्ट’ आधीच डबघाईला आलेली असताना पुन्हा ‘बेस्ट’ला कोट्यवधी रुपयांचा आर्थिक फटका बसला. महाराष्ट्र बंद मुळे बेस्टच्या बसेस आगारातच उभ्या होत्या. कर्मचाऱ्यांना आणण्यासाठी ज्या बस आगारातून बाहेर पडल्या त्यांना मात्र कार्यकर्त्यांकडून लक्ष्य करण्यात आले. यामुळे ११ बसचे नुकसान होऊन दिवसभराचे उत्पन्नही बुडाले.

बेस्टकडून सादर करण्यात आलेल्या २०२२- २३च्या अर्थसंकल्पात दोन हजार २३६ कोटी रुपयांची तूट दर्शविण्यात आली आहे. त्यातच कालच्या महाराष्ट्र बंद मुळे सुमारे दोन कोटी रुपयांचे नुकसान ‘बेस्ट’ ला झाले आहे. बेस्टच्या बसेसमधून दररोज सुमारे २७ लाख प्रवासी प्रवास करत असतात आणि त्यातून सुमारे दोन कोटींची कमाई होते. बस गाड्यांची तोडफोड करण्यात आल्याने दुपारनंतर बेस्ट प्रशासनाने पोलीस संरक्षण घेतले आणि त्यानंतर बसेस आगाराबाहेर पडू लागल्या. दररोज सरासरी तीन हजार बसगाड्या चालवण्यात येतात. काल संध्याकाळी ५.३० पर्यंत एक हजार आठ तर सात पर्यंत एक हजार ८८६ बसगाड्या बाहेर काढण्यात आल्या, अशी माहिती बेस्ट प्रशासनाकडून देण्यात आली.

हे ही वाचा:

जळगावात फुकटसेनेच्या ‘रणरागिणींचा’ भलताच प्रताप

वाहतूक नियम मोडणाऱ्यांना लावणार जबरदस्त ‘ब्रेक’

एनसीबी संचालक वानखेडे यांच्या मागावर गुप्तहेर

नरिनच्या अष्टपैलू खेळीने कोलकाताला तारले

प्रत्येक आंदोलनाच्या वेळी बेस्ट बसेसवरच पहिला हल्ला होत असल्याचे दिसून आले आहे. त्यासाठीच खबरदारीचा उपाय म्हणून बेस्टने काही बस गाड्यांवर जाळ्या बसविल्या आहेत. तरीही ११ गाड्यांचे नुकसान झालेच. सामान्य जनतेलाही प्रचंड त्रास सहन करावा लागला. वाहतुकीसाठी साधनेच उपलब्ध नसल्याने रेल्वे स्थानक, बस स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी जमली होती. अजूनही सर्वांना रेल्वेने प्रवास करण्यास मुभा नसल्याने अनेक जण आपल्या कार्यालयात पोह्चण्यासाठी बेस्ट बस, रिक्षा, टॅक्सीचा मार्ग निवडत असतात. मात्र बेस्ट बसेस बंद असल्यामुळे आणि इतर सोयीही बंद असल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली होती.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा