28 C
Mumbai
Friday, March 29, 2024
घरराजकारण‘बंदमुळे भाज्या, फळे नासली; ३०० ट्रक माल पडून राहिला’

‘बंदमुळे भाज्या, फळे नासली; ३०० ट्रक माल पडून राहिला’

Google News Follow

Related

भाजपा प्रदेश आयटी सेल संयोजक सतीश निकम यांचा आरोप

राज्यातील महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी शेतकऱ्यांसाठी बंद केल्याचे म्हटले असले तरी महाराष्ट्र बंदमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे जबर नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये जवळपास ३००-३५० ट्रक माल येऊन पडला आहे आणि त्यात नाशवंत पदार्थ आहेत, त्याचा फटका बाकी कुणाला नाही, तर शेतकऱ्यांनाच बसला आहे, असा आरोप भाजपा प्रदेश आयटी सेलचे संयोजक सतीश निकम यांनी केला आहे.

ते म्हणाले की, आता कुठे सामान्य घटक कोरोनाच्या जंजाळातून बाहेर येत असताना आणि आता कुठे थोडे पैसे मिळविण्याचा मार्ग मोकळा होत असताना महाराष्ट्र बंद करणे अजिबात योग्य नव्हते. पण याच लोकांनी

एपीएमसी मार्केटमध्ये फेरी काढून व्यापाऱ्यांना धमकावले.

निकम म्हणाले की, मला अनेक व्यापारी भेटले. रविवारी मार्केट बंद असल्यामुळे सोमवारी भाजी, फळे घेऊन येणाऱ्या गाड्यांची संख्या वाढते. त्या समजा २५० गाड्या असतील तर सोमवारी बंदमुळे मंगळवारी या गाड्यांमध्ये आणखी भर पडत त्या ३००-३५० गाड्या  येतात आवक वाढते सोमवारी बंद असेल तर मंगळवारीही आवक वाढेल. यामुळे भाज्या, फळांचे दर घसरतात. पण याचा फटका थेट शेतकऱ्यांना बसतो. म्हणजेच हा बंद शेतकऱ्यांचे नुकसान करणारा होता. निकम यांनी सांगितले की, काल आलेले सीताफळ, डाळींब जर विकले गेले नाही. तर माल पिकून खराब होणार आहे. हे नुकसान शेतकऱ्यांचेच आहे. हा माल विकतही घेतला जाणार नाही. निकम यांनी असेही सांगितले की, केवळ एक दिवस बंद असला तरी शेतकऱ्यांना पूर्ण आठवडा नुकसान सहन करावे लागणार आहे. भाव पडल्यामुळे आठवडाभर शेतकऱ्याच्या खिशावर त्याचा परिणाम होणार आहे. नवी मुंबई मार्केट महाराष्ट्रातली मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळे अवघ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

हे ही वाचा:

जळगावात फुकटसेनेच्या ‘रणरागिणींचा’ भलताच प्रताप

‘स्वातंत्र्यसैनिकांच्या घरी जाऊन पेन्शन पोहोचवा!’

‘बेस्ट’ला महाराष्ट्र बंदचा बसला दोन कोटींचा फटका!

डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांना केरळ बोर्डाचे ‘मार्क्स’

 

निकम यांनी पुढील प्रश्न उपस्थित केले.

१.आज जर हा माल विकला गेला नाही तर नुकसान कुणाचे होणार?

२. आवक जास्त झाली म्हणून स्वाभाविक आहे की मालाला जो दर मिळायला हवा तो मिळणार नाही. मग फटका कुणाला बसणार आहे?

३. शनिवारपासून काढलेला माल गाडीत पडून राहिला तर तो पिकून गेला असणार. तो आता विकता येणार नाही किंवा विकत घेतला जाणार नाही, त्याची जबाबदारी कुणाची?

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
144,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा