२६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणा यांना दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. कोर्टाने त्याला त्याच्या कुटुंबाशी फोनवर बोलण्याची परवानगी दिली आहे. विशेष न्यायाधीश न्यायमूर्ती चंद्रजीत सिंह यांनी दहशतवादी राणाला एकदाच फोन करण्याची परवानगी दिली आहे. यामुळे तो त्याच्या कुटुंबाशी फक्त एकदाच बोलू शकणार आहे. न्यायाधीशांनी सांगितले की हा कॉल तुरुंग नियमावलीनुसार असेल आणि तिहार तुरुंग प्रशासनाच्या देखरेखीखाली केला जाईल.
न्यायालयाने तहव्वुर राणाच्या प्रकृतीबाबत नवीन अहवालही मागितला आहे, जो सोमवारपासून दहा दिवसांच्या आत न्यायालयात सादर करावा लागेल. यासोबतच, राणाला नियमित फोन कॉल करण्याची परवानगी द्यायची की नाही हे देखील तुरुंग प्रशासनाला स्पष्ट करण्यास सांगितले आहे.
एनआयएने आरोपी राणाला ताब्यात घेतल्यानंतर त्याने आपल्या कुटुंबाशी बोलण्याची इच्छा व्यक्त केली होती. राणाच्या वकिलाने असा युक्तिवाद केला की, परदेशी नागरिक म्हणून त्याच्या कुटुंबाशी बोलणे हा राणाचा मूलभूत अधिकार आहे. राणाच्या कुटुंबाला त्याच्या आरोग्याची काळजी असल्याचे वकिलाने म्हटले.
हे ही वाचा :
एसबीआयने सरकारला किती हजार कोटींचे लाभांश दिले?
केरळ किनाऱ्याजवळ सिंगापूरच्या मालवाहू जहाजात स्फोट, ४ क्रू मेंबर्स बेपत्ता!
HIS STORY OF ITIHAS…डाव्या विचारसरणीचा बुरखा फाडणारा सत्यशोधाचा पट
राजा रघुवंशी लग्नाला तयार नव्हता, सोनमला या लग्नात रस नाही, असे त्याचे म्हणणे होते!
यापूर्वी, २४ एप्रिल रोजी विशेष न्यायाधीश चंदरजीत सिंह यांनी राणाने त्याच्या कुटुंबाशी बोलण्याची परवानगी मागितलेली याचिका फेटाळून लावली होती. एनआयएने त्याच्या याचिकेला विरोध केल्यानंतर न्यायालयाने हा निर्णय दिला होता. सुनावणीदरम्यान, एनआयएने असा युक्तिवाद केला की जर राणाला त्याच्या कुटुंबातील सदस्यांशी बोलण्याची परवानगी दिली तर तो संभाषणादरम्यान अनेक महत्त्वाची माहिती शेअर करू शकतो.
