दक्षिण जपानच्या ओकिनावा प्रांतातील कडेना एअरबेसजवळ सोमवारी झालेल्या स्फोटात जपान ग्राउंड सेल्फ डिफेन्स फोर्स (JGSDF) चे चार सदस्य जखमी झाले, अशी माहिती जपानी माध्यमांनी दिली आहे. स्थानिक प्रशासन आणि जपानच्या संरक्षण मंत्रालयानुसार, जखमी कर्मचारी डिपोमध्ये काम करत होते. स्थानिक वेळेनुसार सकाळी सुमारे ११.२० वाजता अग्निशमन विभागाला एसडीएफ (Self Defense Force) द्वारा चालवलेल्या प्लांटमध्ये स्फोट झाल्याची माहिती मिळाली. तेव्हा कर्मचारी बॉम्ब निकामी करण्याच्या मोहिमेची तयारी करत होते.
क्योडो न्यूजच्या रिपोर्टनुसार, मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, “जेव्हा एसडीएफचे जवान स्फोटक निकामी करण्याच्या मोहिमेची तयारी करत होते, तेव्हा अज्ञात कारणामुळे स्फोट झाला, ज्यामुळे काही जवानांच्या बोटांना इजा झाली आणि ऐकण्याची क्षमता ही बाधित झाली. संरक्षण मंत्रालयातील एका सूत्राने सांगितले की, स्फोट एसडीएफ बेसच्या गोळाबारूद डिपो परिसरात स्थित निष्क्रिय बॉम्ब साठवण केंद्रात झाला.
हेही वाचा..
एसबीआयने सरकारला किती हजार कोटींचे लाभांश दिले?
केरळ किनाऱ्याजवळ सिंगापूरच्या मालवाहू जहाजात स्फोट, ४ क्रू मेंबर्स बेपत्ता!
राजा रघुवंशी लग्नाला तयार नव्हता, सोनमला या लग्नात रस नाही, असे त्याचे म्हणणे होते!
२०२५ मध्ये फॉर्म १६ दिसणार वेगळा
स्थानिक प्रशासनाच्या हवाल्याने सांगण्यात आले की, आजूबाजूच्या रहिवाशांसाठी कोणताही स्थलांतराचा आदेश जारी करण्यात आलेला नाही आणि पुढील स्फोट किंवा आगीचा कोणताही धोका नाही. जखमींपैकी कोणाचीही स्थिती गंभीर नाही. सध्या पोलीस घटनास्थळी तपास करत आहेत.
आजूबाजूच्या रहिवाशांना स्थलांतरित करण्याची गरज भासलेली नाही. JGSDF (जपान ग्राउंड सेल्फ डिफेन्स फोर्स) मोठ्या प्रमाणावर आपत्तीजन्य घटना – जसे की भूकंप, वादळ, पुर, ज्वालामुखीचा उद्रेक किंवा हिमवृष्टी – यामुळे झालेल्या नुकसानीसाठी बचावकार्य किंवा जीवनरक्षक मोहिमा राबवते, जेणेकरून नागरिकांचे जीवन व संपत्ती सुरक्षित राहील. द्वितीय महायुद्धात जपानचा पराभव झाल्यानंतर, १९७२ मध्ये ओकिनावा अमेरिकेच्या ताब्यातून पुन्हा जपानकडे आला, तरी आजही ओकिनावा प्रांतात अमेरिकेच्या लष्करी तळांचा मोठा हिस्सा कायम आहे.
