35 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
घरविशेषसीडीएस रावत आणि त्यांच्या पत्नीवर १० डिसेंबरला अंत्यसंस्कार

सीडीएस रावत आणि त्यांच्या पत्नीवर १० डिसेंबरला अंत्यसंस्कार

Google News Follow

Related

सीडीएस बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नीचे पार्थिव ९ डिसेंबरला संध्याकाळी लष्करी विमानाने देशाच्या राजधानीत पोहोचणार आहे. रावत दाम्पत्याचे पार्थिव त्यांच्या कामराज मार्गावरील शासकीय निवासस्थानी आणण्यात येणार आहे. आणि १० डिसेंबर रोजी दिल्ली कॅन्टोन्मेंट येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. बुधवारी त्यांच्या हेलिकॉप्टरला झालेल्या अपघातात रावत आणि त्यांच्या पत्नीचे निधन झाले होते. त्यासोबत लष्करातील अधिकारी, जवानांसह ११ जणही या घटनेत मृत्युमुखी पडले.

चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नीवर १० डिसेंबर रोजी दिल्ली कॅन्टोन्मेंट येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत मृतदेह अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहेत. यानंतर, येथून त्यांची अंतिम यात्रा दिल्ली छावणीतील बेरार स्क्वेअर स्मशानभूमीकडे नेण्यात येईल, जिथे शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. बिपिन रावत यांच्या निधनामुळे उत्तराखंडमध्ये तीन दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.

हे ही वाचा:

दिल्लीतील रोहिणी कोर्टात स्फोट, एक जखमी

सीडीएस बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टरचा संपर्क तुटला… राजनाथ सिंह यांनी संसदेत दिली माहिती

सीडीएस बिपीन रावत यांच्या मृत्यूबद्दल संजय राऊत यांना शंका

‘जे बोललो त्याचा विपर्यास करुन प्रकरण वाढवले गेले’

 

वायुसेनेने झालेल्या अपघाताबद्दल शोक व्यक्त केला आहे. हवाईदलाने ट्विट करून माहिती दिली की, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपिन रावत हे ८ डिसेंबर रोजी डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज, वेलिंग्टन (निलगिरी हिल्स) येथे दौऱ्यावर गेले होते. एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरी आणि भारतीय वायुसेनेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत आणि मधुलिका रावत यांच्या दुर्दैवी हेलिकॉप्टर अपघातात ११ इतर सेवा कर्मचार्‍यांच्या अकाली निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे.

आयएएफने म्हटले आहे की, जनरल बिपिन रावत हे त्यांच्या नेतृत्वासाठी व दूरदृष्टीसाठी तसेच ,डीडब्लूडब्लूए च्या अध्यक्षा मधुलिका रावत या त्यांच्या व्यक्तिमत्वसाठी नेहमीच स्मरणात राहतील. ग्रुप कॅप्टन वरुण सिंग लवकर बरे व्हावेत यासाठी आम्ही प्रार्थना करत आहोत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा