29 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
घरविशेषलग्नाचा अनोखा स्टंट पडला महागात!

लग्नाचा अनोखा स्टंट पडला महागात!

Google News Follow

Related

भारतात आता विवाह सोहळ्याची धामधूम सुरु आहे. असाच एका ठिकाणी नेत्रदीपक विवाह सोहळा पार पडला.

मात्र, सोहळ्यात झालेला एक स्टंट वधू वराच्या अंगाशी आला आहे. लग्नाच्या कार्यक्रमादरम्यान, फटाक्यांनी वेढलेल्या झुल्यावरून हवेत झेपावताना १२ फूट उंचीवरून ते जोडपे खाली कोसळले.

भारतातील छत्तीसगडमधील रायपूर येथे लग्नाच्या स्टंटदरम्यान गोलाकार झुल्यावर हवेत झेपावल्याने एक जोडपे १२ फूटावरून जमिनीवर पडले. शनिवारी संध्याकाळी या नेत्रदीपक सोहळ्यात एका फटाक्यांनी वेढलेल्या चक्राकार झोपाळ्यावर वधूवर स्वार झाले. आणि उंचावर गेल्यानंतर एका बाजूची दोरी तुटली आणि क्षणातच जोडपे जमिनीवर कोसळले. सुदैवाने या जोडप्याला किरकोळ दुखापत झाली आहे.

दोरी तुटल्यानंतर लगेचच पाहुणे आणि इतर मंडळी त्या जोडप्याला वाचवण्यासाठी स्टेजकडे धाव घेतली. आणि हा सर्व प्रकार एका व्हिडिओत कैद झाला आणि क्षणातच सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला. स्थानिक अहवालानुसार,अर्ध्या तासानंतर विवाह सोहळा पार पडला.

वृत्तानुसार, कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही आणि इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीने या घटनेबद्दल माफी मागितली आहे. एनडीटीव्हीशी बोलताना कंपनीतील एका कर्मचाऱ्याने सांगितले की, या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. वधू वरही सुरक्षित आहेत. तसेच, भविष्यात अशी घटना न घडण्याची खबरदारी घेऊ असा दावा इव्हेंट मॅनेजमेंटच्या एका कर्मचाऱ्याने केला.

हे ही वाचा:

मिस युनिव्हर्स हरनाजला मिळणार या उत्तमोत्तम सुविधा आणि घसघशीत कमाई!

सोनियांच्या घरी शरद पवार भेटीला

हेल्मेट घाला, वाहन हळू चालवा नाहीतर…

सात महिन्यांच्या संसारात शिरले संशयाचे भूत आणि झाले असे विपरित…

 

गेल्या महिन्यात असाच एक प्रकार महाराष्ट्रातील भिवंडीत घडला होता. फटाक्यांमुळे स्टेजवर आग लागली होती. यात वाहने, खुर्च्या आणि सजावटीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असले तरी कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या सोहळ्यातील एक वेगळाच व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाला होता. आग लागल्यामुळे सगळे लोक स्टेजकडे धावत होते. पण दोन व्यक्ती आग लागलेली दिसत असतानाही, मनोसोक्त जेवणाचा आनंद घेत होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा