26 C
Mumbai
Monday, February 19, 2024
घरविशेषमुख्यमंत्री सामूहिक विवाह योजनेच्या लाभापोटी २००हुन अधिक जोडप्यांनी केला 'बनावट' विवाह!

मुख्यमंत्री सामूहिक विवाह योजनेच्या लाभापोटी २००हुन अधिक जोडप्यांनी केला ‘बनावट’ विवाह!

उत्तर प्रदेशातील बलिया येथे ५६८ जोडप्यांचा पार पडला सामूहिक विवाहसोहळा

Google News Follow

Related

उत्तर प्रदेशातील बलिया येथे पार पडलेल्या सामूहिक विवाह सोहळ्यात २०० हून अधिक जोडप्यांनी बनावट विवाह केल्याचे आढळून आले आहे.२५ जानेवारी रोजी हा सोहळा पार पडला होता.या घोटाळ्याप्रकरणी पोलिसांकडून आतापर्यंत समाजकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांसह १५ जणांना अटक करण्यात आली आहे.सामूहिक विवाह योजनेंतर्गत पार पडलेल्या विवाह सोहळ्याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.या व्हिडिओमध्ये समारंभात वधू स्वतःला हार घालताना दिसत आहेत.

अधिका-यांनी सांगितले की, सामूहिक विवाह सोहळ्यात ५६८ जोडप्यांचे लग्न झाले होते. तथापि, नंतर तपासात उघड झाले की २०० हून अधिक जोडप्यांना सोहळ्यात वधू आणि वर म्हणून उपस्थित राहण्यासाठी पैसे दिले गेले होते.

इंडिया टुडेने दिलेल्या बातमीनुसार, १९ वर्षांच्या एका तरुणाने इंडिया टुडे टीव्हीला सांगितले की, सामूहिक विवाह सोहळ्यात बसण्यासाठी त्याला २,००० रुपये देऊ करण्यात आले होते.मात्र, त्याला पैसे मिळाले नसल्याचे त्याने सांगितले.याप्रकरणी २९ जानेवारी रोजी मुख्य विकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती.समितीच्या तपासात असे आढळून आले की, काही लाभार्थींचे २०२३ मध्ये लग्न झाले होते.तसेच अनेकजण मुख्यमंत्री सामूहिक विवाह योजनेंतर्गत पात्र नसल्याचे समितीने आपल्या अहवालात सांगितले आहे.योजनेचा लाभ मिळविण्यासाठी अपात्र अर्जदारांनी आपले वास्तविक तथ्य लपवून बेकायदेशीरपणे अर्ज केला होता, असे अहवालात म्हटले आहे.

हे ही वाचा:

संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पौषवारी यात्रोत्सवासाठी कायमस्वरुपी निधी देणार

‘तो’ वादग्रस्त भाग सहावीच्या पुस्तकातून काढला

शुभमन गिलचे तिसरे कसोटी शतक; इंग्लंडला हव्यात ३३२ धावा

धुळ्यात गुटखा तस्करांवर मोठी कारवाई, तब्बल दोन कोटींचा मुद्देमाल जप्त!

समाजकल्याण विभागाचे सहाय्यक विकास अधिकारी यांनी हे अर्ज तपासण्यात हलगर्जीपणा केल्याने ही फसवणूक झाली.दरम्यान, जिल्हा दंडाधिकारी रवींद्र कुमार यांनी सांगितले की, मणियार विकास गटात झालेल्या सामूहिक विवाह कार्यक्रमातील लाभार्थ्यांना अद्याप निधी वितरित करण्यात आलेला नाही.तसेच कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या भाजप आमदार केतकी सिंह यांनी सांगितले की, मीडिया रिपोर्ट्सद्वारे फसवणुकीची माहिती आम्हाला मिळाली असून आम्ही फसवणूक करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करू, असे आश्वासन केतकी सिंह यांनी दिले.

दरम्यान, मुख्यमंत्री सामूहिक विवाह योजनेंतर्गत लाभार्थ्यांना सुमारे ५१,००० रुपये दिले जाते.मूळ रकमेपैकी ३५,००० रुपये मुलीला, १०,००० रुपये विवाह साहित्य खरेदीसाठी आणि ६,००० रुपये कार्यक्रमासाठी दिले जाते, असे सरकारी वेबसाइटवर म्हटले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
129,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा