29 C
Mumbai
Saturday, October 1, 2022
घरविशेषडबघाईस आलेल्या ललित कला प्रतिष्ठानच्या विश्वस्त मंडळालाच डच्चू द्या!

डबघाईस आलेल्या ललित कला प्रतिष्ठानच्या विश्वस्त मंडळालाच डच्चू द्या!

Related

नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांची मागणी

बृहन्मुंबई क्रीडा व ललित कला प्रतिष्ठानच्या अनागोंदी कारभाराकडे महापालिकेने केलेल्या दुर्लक्षामुळे प्रतिष्ठानकडे कर्मचाऱ्यांचे वेतन देण्याएवढेही पैसे नाहीत. यावर उपाय म्हणून प्रतिष्ठानने पालिकेकडे २५ कोटी रुपयांच्या बिनव्याजी कर्जाची मागणी केली आहे. आणखी नामुष्की टाळायची असेल तर ललित कला प्रतिष्ठानचे विश्वस्त मंडळ बरखास्त करून तज्ज्ञ, प्रामाणिक व्यक्तींकडे जबाबदारी देण्यात यावी, अशी मागणी भाजपाचे नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांनी केली आहे.

पालिकेच्या या वास्तुमध्ये कला व क्रीडाप्रकारांना वाव देण्यासाठी १९९०ला बृहन्मुंबई क्रीडा व ललित कला प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली. मात्र आता कला आणि क्रीडा या दोन गोष्टींना महत्त्व न देता केवळ व्यावसायिकरण केल्यामुळे ठेकेदारांची मनमानी वाढली आहे. त्यामुळे प्रतिष्ठानच्या मूळ उद्देशांनाच हरताळ फासला गेला आहे, असे गंगाधरे यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.

हे ही वाचा:
तुम्ही खरंच स्वबळावर लढणार असाल तर आधीच सांगा

पंकजा मुंडे कधीच बंडाचा विचार करणार नाहीत

पुलावामामध्ये लष्करच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा

रोल्स रॉयस मधून फिरणाऱ्या शिवसेना नेत्यावर ३५ हजारच्या वीज चोरीचा गुन्हा

ते म्हणतात की, या प्रतिष्ठानच्या अंधेरी व मुलुंड येथील हजारो कोटींच्या वास्तुंचा जनतेला कोणताही फायदा होत नाही. त्याबद्दल या दोन्ही ठिकाणच्या लोकांच्या तक्रारी आहेत. या प्रतिष्ठानकडे याआधी १८ कोटीच्या ठेवी होत्या पण त्या आता ६ कोटींवर आल्या आहेत. प्रतिष्ठानवर विश्वस्तांचा कोणताही अंकुश राहिलेला नाही. म्हणूनच या प्रतिष्ठानचे विद्यमान विश्वस्त मंडळ बरखास्त करा आणि कार्यक्षम, प्रामाणिक व्यक्तींकडे ही जबाबदारी सोपवा.

कर्मचाऱ्यांना पंधरा महिने १० हजार पगार

या प्रतिष्ठानच्या माध्यमातून अंधेरीतील शहाजीराजे क्रीडा संकुल आणि मुलुंडचे कालिदास नाट्यगृह यांचा कारभार २०१६पर्यंत उत्तम सुरू होता. तोपर्यंत संस्थेकडे १८ ते २० कोटींच्या ठेवी होत्या. कोरोना काळात प्रतिष्ठानचे उत्पन्न घटल्याचे विश्वस्तांचे म्हणणे आहे. दोन्ही वास्तुंमध्ये सुमारे ८४ अधिकारी व कर्मचारी आहेत. पण त्यांना देण्यासाठी पैसेही नाहीत. त्यामुळे गेले १५ महिने मासिक फक्त १० हजार रुपये पगार त्यांना दिला जातो.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,969चाहतेआवड दर्शवा
1,945अनुयायीअनुकरण करा
41,700सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा