30.1 C
Mumbai
Sunday, February 5, 2023
घरविशेषविरोधकांनी स्वतःच्या काळातील गोष्टीच घोटाळे म्हणून दाखविल्या!

विरोधकांनी स्वतःच्या काळातील गोष्टीच घोटाळे म्हणून दाखविल्या!

सत्तारांची कोणतीही मुलगी टीईटीअंतर्गत नोकरीला लागली नाही

Google News Follow

Related

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारमधील कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी टीईटी घोटाळ्याचे आरोप केले. यावेळी अब्दुल सत्तार यांच्या विरोधात अजित पवार आक्रमक झाल्याचे दिसून आले. अब्दुल सत्तार यांना टीईटी घोटाळ्यावरून लक्ष्य करण्याचा प्रयत्न करण्यात आला. टीईटी घोटाळ्याचे आरोप झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टोलेबाजी केली. मी असा विरोधी पक्षच पाहिलेला नाही, असं म्हणत खोचक टोला लगावला. टीईटी घोटाळा कोणाच्या काळात झाला? भारताच्या इतिहासातील हा पहिलाच विरोधी पक्ष आहे, जो स्वतःच्या काळातील प्रकरणे, घोटाळे बाहेर काढत आहे.

राज्यातल्या लाखो तरूणांना बुडवणारा हा टीईटी घोटाळा महाविकास आघाडी सरकारच्या काळात झाला. यांच्याच काळात झालेल्या टीईटी घोटाळ्याचे तार मंत्रालयापर्यंत गेले. घोटाळ्यातील आरोप असलेले मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांना अटक झाली. आता या घोटाळ्यावरून अब्दुल सत्तार यांच्यावर आरोप केले जात आहेत. सत्तार यांच्या कुठल्याही मुलीला टीईच्या अंतर्गत नोकरी लागलेली नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

हेही वाचा :

पोलिसांना धमकावल्याप्रकरणी आमदार नितीन देशमुखांवर गुन्हा

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची तुरुंगातून सुटका

बॉम्बचा फुगा, अजितदादांची टाचणी

लिओनेल मेस्सीचे धोनीच्या मुलीला खास गिफ्ट

एक नवी पद्धत सुरू झाली आहे की, कुठल्याही मंत्र्यावर बेछूट आरोप करायचे. दिवसभर मीडियात तेच चालवत राहायचे. पण या असल्या गोष्टी आम्ही खपवून घेणार नाही. त्या आरोपांना तसंच आम्ही देऊ असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. खरं म्हणजे मला तर आश्चर्य वाटते की हा पहिला विरोधी पक्ष असेल जो सत्ताकाळातल्या गोष्टी भ्रष्टाचार म्हणून बाहेर काढतो आहे. असा विरोधी पक्ष पाहिलेला नाही.

मला माहित आहे, वरून आदेश असेल. मला माहित आहे की बॉम्ब बॉम्ब म्हणत होते पण लवंगी फटाकाही सापडला नाही. सभात्याग करणाऱ्यांनी मला उत्तर द्यावं की टीईटी घोटाळा का झाला? लाखो विद्यार्थ्यांचं स्वप्न त्या ठिकाणी चुरडण्याचे काम कुणी केले? अपात्र कंपन्यांना पात्र कुणी केले? अब्दुल सत्तार यांची कोणतीही मुलगी टीईटीअंतर्गत नोकरीला लागली नाही. असेही प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,911चाहतेआवड दर्शवा
2,002अनुयायीअनुकरण करा
61,400सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा