26 C
Mumbai
Thursday, July 25, 2024
घरविशेषउत्तर प्रदेशात बसची दुधाच्या टँकरला धडक; अपघातात १८ जणांचा मृत्यू

उत्तर प्रदेशात बसची दुधाच्या टँकरला धडक; अपघातात १८ जणांचा मृत्यू

अपघातात अनेक प्रवासी जखमी; उपचार सुरू

Google News Follow

Related

उत्तर प्रदेशात भीषण अपघात झाला आहे. स्लीपर डबल डेकर बस आणि दुधाच्या टँकरच्या झालेल्या या भीषण अपघातात १८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २० हून अधिक जण जखमी झाले आहेत. उत्तरप्रदेशातील बेहता मुजावर परिसरात हा भीषण अपघात झाला. लखनौ-आग्रा एक्स्प्रेस-वेवर भरधाव वेगात असणारी बस दुधाच्या कंटेनरवर आदळल्यानं भीषण अपघात झाला.

माहितीनुसार, लखनौ-आग्रा महामार्गावर बुधवारी पहाटे भीषण अपघात झाला. बिहारमधील सीतामढीहून दिल्लीला जाणाऱ्या एका डबल डेकर बसने दुधाच्या टँकरला भीषण धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की यात बस आणि कंटेनरचाही अक्षरशः चुराडा झाला आहे. उन्नावमधील बेहता मुजावर पोलीस स्टेशन हद्दीतील गधा गावासमोर हा अपघात झाला.

दिल्लीच्या दिशेने जाणाऱ्या या स्लीपर बसच्या चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे. महामार्गावर वेगाने बस चालवणाऱ्या चालकाने बसवर नियंत्रण न ठेवता आल्याने ही बस थेट दुधाच्या टँकरला धडकली. हा टँकर महामार्गाच्या कडेला उभा होता. पहाटे सव्वा पाचच्या सुमारास हा अपघात झाला असून या अपघातात दोन्ही वाहनांचा चुराडा झाला आहे. अपघातात १८ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर, २० हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तातडीने बचाकार्याला सुरुवात केली. अपघात नेमका कसा झाला याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.

हे ही वाचा:

मराठवाड्यासह विदर्भाला ४.२ रिश्टर स्केल भूकंपाचा बसला धक्का

तेजस ठाकरे अंबानींच्या कार्यक्रमात नाचले, झाली टीका!

फ्रान्समध्येही टॅक्टिकल वोटींगचा बोलबाला… फ्रेंच खिचडी शिजणार का?

गौतम गंभीर भारतीय क्रिकेट संघाचे नवे प्रशिक्षक

घटनेनंतर सर्व जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सर्व जखमींवर उपचार सुरू आहेत. त्यातील काहींची प्रकृती गंभीर असून काहींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. मृतांमध्ये १४ जणांची ओळख पटली आहे. तर, इतर मृतदेहांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
167,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा