27.9 C
Mumbai
Friday, October 30, 2026
घरविशेषस्वित्झर्लंडमध्ये बसमधून उतरून चालकाने पढला नमाज, प्रवासी राहिले ताटकळत

स्वित्झर्लंडमध्ये बसमधून उतरून चालकाने पढला नमाज, प्रवासी राहिले ताटकळत

बस कंपनीने मात्र स्पष्ट भूमिका घेणे टाळले

Google News Follow

स्वित्झर्लंडमधील झ्युरिशसी आणि ओबरलँड ट्रान्सपोर्ट प्राधिकरण (व्हीझेडओ) च्या चालकाने स्टॅफा येथील फ्रोहबर्ग बसथांब्यावर मार्ग क्रमांक ८८० वरील नियोजित बस थांबवली. बस थांबताच संबंधित मुस्लिम कर्मचाऱ्याने स्वतः बसमधून उतरून वाहनासमोर, मक्केच्या दिशेने तोंड करून, प्रार्थनेसाठी आपली नमाजची चटई अंथरली आणि नमाज अदा केली. हा प्रकार पाहून प्रवासी आणि स्थानिक नागरिक आश्चर्यचकित झाले.

या घटनेची नोंद तेथील बातम्यांमध्येही घेण्यात आली. याची पोस्ट आता व्हायरल होत आहे. ८ जुलैची ही घटना आहे.

या घटनेबाबत सर्वप्रथम साप्ताहिक वेल्टवोखने वृत्त दिले. सार्वजनिक वाहतूक संस्थेत स्विस चालकांची संख्या कमी होत असली, तरी व्हीझेडओच्या नेहमीच्या कार्यपद्धतीपासून ही घटना वेगळी असल्याचे सांगितले गेले.

हे ही वाचा:

रसायनशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारताची सोनेरी कामगिरी

सिंधूने घडवला इतिहास, जपान ओपन जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू

नीट निकालातील गोंधळावरून पालकांची हायकोर्टात धाव

२० जुलैला उपोषण थांबणार! सुरू होणार संसदेतला गोंधळ

राज्य चालवत असलेल्या संस्थेतील कर्मचाऱ्याच्या या वर्तनाबाबत विचारणा केल्यानंतर व्हीझेडओ आणि झ्युरिख ट्रान्सपोर्ट असोसिएशन यांनी दिलेली उत्तरे टाळाटाळ करणारी असल्याचा दावा करण्यात आला आहे. दोन्ही संस्थांनी या विषयावर स्पष्ट भूमिका घेणे टाळल्याचे नमूद करण्यात आले आहे. हा विषय त्यांच्यासाठी अस्वस्थ आणि लाजिरवाणा असल्याचे जाणवत असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.

व्हीझेडओने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, स्वित्झर्लंडमध्ये धर्मस्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर केला जातो. याबाबत कोणीही प्रश्न उपस्थित केलेला नाही, असेही नमूद करण्यात आले आहे. तसेच, कामाच्या वेळेत धार्मिक विधी करणे हे व्हीझेडओच्या तत्त्वांशी आणि मार्गदर्शक तत्त्वांशी सुसंगत नाही, असे संस्थेने स्पष्ट केले. या प्रकरणावर संस्थेने इतकेच स्पष्टीकरण दिले.

या प्रकारापासून स्पष्टपणे स्वतःला दूर ठेवण्यासाठी अधिक ठोस भूमिका आवश्यक आहे. भविष्यात चालकांकडून अशा प्रकारचे वर्तन सहन केले जाणार नाही, असे स्पष्टपणे या निवेदनात सांगितले गेलेले नाही, अशी टीका करण्यात आली आहे. तसेच, शालेय सहलीदरम्यान बससमोर नमाजची चटई अंथरण्याची प्रथा या देशात सामान्य होऊ नये यासाठी कोणती उपाययोजना केली जात आहे, याचाही उल्लेख या निवेदनात नाही.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा