33 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
घरविशेषभारतीय वायुदलात 'सी-२९५' वाहतूक विमान दाखल!

भारतीय वायुदलात ‘सी-२९५’ वाहतूक विमान दाखल!

पाकिस्तान आणि चीनला भरणार धडकी

Google News Follow

Related

भारतीय वायू दलात सी-२९५ एअरक्राफ्ट (C२९५ Transport Aircraft) सामील झाला आहे. चीन आणि पाकिस्तान सारख्या भारताच्या शत्रूंना धडकी भरवण्यासाठी सी-२९५ ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट म्हणजेच सी-२९५ वाहतूक विमान अधिकृतपणे भारतीय वायू दलात दाखल झालं आहे. आज भारत ड्रोन शक्ती २०२३ हा कार्यक्रम पार पडला.या कार्यक्रमाचे उदघाटन देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते झाले.भारतीय वायू दलात सी-२९५ दाखल झाल्यामुळे भारताची आणखी ताकद वाढली आहे.

भारतीय वायू दलात ५० हून सी-२९५ विमाने सामील होणार आहेत. आज सी-२९५ एअरक्राफ्ट भारतीय वायू दलाची ताकद वाढवण्यासाठी अधिकृतरित्या भाग बनला आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंद यांनी गाझियाबाद येथील हिंजन एअरबेसवर एका कार्यक्रमात हे विमान अधिकृतरित्या वायू दलाकडे सोपवलं आहे. २०२६ पर्यंत एकूण ५६ सी -२९५ विमाने वायू दलात दाखल होतील.यांचा खर्च सुमारे २१,९३५ कोटी रुपये इतका आहे.

हे ही वाचा:

चांद्रयान ३, जी-२० परिषदेने भारताला शिखरावर नेले!

भारताच्या जी-२० अध्यक्षपदाची संयुक्त राष्ट्रांकडून स्तुती !

मुंबईत दीड दिवसाच्या गणेशमूर्तींच्या कृत्रिम तलावातील विसर्जनात यंदा २३ टक्के वाढ

निज्जरच्या हत्येनंतर एफबीआयने यूएस खलिस्तान्यांना केले होते सावध !

टाटा (TATA) आणि एयरबस (Airbus) डिफेन्स कंपनी या दोन कंपन्यांनी मिळून हे विमान बनवलं आहे. स्पेनमधून ६ हजार ८५४ किलोमीटरचे अंतर कापून हे विमान २० सप्टेंबरला वडोदरा येथे पोहोचले. आज हे विमान वडोदराहून टेकऑफ झाल्यानंतर आणि हिंडन एअरबेसवर पोहोचलं. या विमानाची सर्वात खास गोष्ट म्हणजे हे विमान एक किलोमीटरपेक्षा कमी अंतरावरील धावपट्टीवरून टेक ऑफ करू शकते आणि याच्या लँडिंगसाठी फक्त ४२० मीटर धावपट्टीची गरज आहे. यामुळे दुर्गम डोंगराळ भागात आणि बेटांवर थेट सैन्य उतरणं शक्य होणार आहे.

सी-२९५ विमानाची खास वैशिष्ट्ये
४८० किलोमीटर प्रतितास वेगाने ११ तास उड्डाण करण्याची क्षमता
दुर्गम भागात लँडींग आणि टेक ऑफसाठी उत्तम
डोंगराळ भागात सैन्य पोहोचवण्यासाठी तसेच जखमी किंवा गरजूंना स्थलांतरित करण्यासाठी फायदेशीर
सैनिकांना सामान पोहोचवण्यासाठी उपयुक्त
आपत्तीच्या काळात मदतीसाठी तसेच समुद्री भागात गस्तीसाठी
सी -२९५ विमाने समाविष्ट केल्यानंतर, Avro-७४८ विमाने टप्प्याटप्प्याने हवाई दलातून बाहेर जातील.
७० च्या दशकातील Avro-७४८ विमान बदलून अत्याधुनिक सी -२९५ विमानामुळे भारताची संरक्षण व्यवस्था आणखी बळकट होईल.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
154,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा