28 C
Mumbai
Sunday, December 8, 2024
घरविशेषसीएएची अंमलबजावणी करण्यापासून कोणी रोखू शकत नाही!

सीएएची अंमलबजावणी करण्यापासून कोणी रोखू शकत नाही!

नागरिकांची दिशाभूल करत असल्याचा अमित शहा यांचा ममतांवर आरोप

Google News Follow

Related

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी स्पष्ट केले की, नागरिकता संशोधन अधिनियम (सीएए) आता देशाचा कायदा बनला आहे. त्यामुळे त्याची अंमलबजावणी करण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. या मुद्द्यावरून ममता बॅनर्जी नागरिकांची दिशाभूल करत आहेत, असा आरोपही शहा यांनी यावेळी केला.

कोलकाताच्या राष्ट्रीय पुस्तकालयात पश्चिम बंगाल भाजपच्या सोशल मीडिया आणि आयटी शाखेच्या सदस्यांसोबत त्यांची बंद खोलीत चर्चा झाली. यावेळी शहा यांनी सीएएची अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे नमूद केले. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपची सत्ता येण्यासाठी आपण काम करायला हवे, असेही त्यांनी सांगितले. भाजप सरकार घुसखोरी रोखेल, गायींची तस्करी संपवेल आणि सीएएच्या माध्यमातून धर्माच्या आधारावर विस्थापित केल्या गेलेल्या नागरिकांना नागरिकत्व बहाल करेल.

हे ही वाचा:

शेख हसिनांकडून मुस्लिमांचे लांगुलचालन!

केएल राहुलने भारताचा खेळ सावरला!

बीसीसीआयचा निर्णय; आयपीएल स्पॉन्सरशिपमध्ये चीनसाठी दरवाजे बंद

आता विनेश फोगाटनेही खेलरत्न, अर्जुन पुरस्कार परत करण्याचा घेतला निर्णय

सन २०१९पासून ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाकडून सीएएला विरोध होत आहे. सीएएचा उद्देश पाकिस्तान, बांग्लादेश आणि अफगाणिस्तानमध्ये छळ होत असल्याने विस्थापित व्हावे लागलेल्या हिंदू, शीख, जैन, बौद्ध, पारशी आणि ख्रिश्चन अल्पसंख्याकांना भारतीय नागरिकत्व देण्याचा आहे. ३१ डिसेंबर, २०१४पूर्वी भारतात आलेल्या या नागरिकांना हा नियम लागू आहे.

बंद खोलीमध्ये झालेल्या या बैठकीत शहा यांनी केलेल्या भाषणाची व्हिडीओ क्लिप जाहीर करण्यात आली आहे. यावेळी शहा यांनी ममता बॅनर्जींवर टीकास्त्र सोडले. सीएए लागू होणार की नाही, याबाबत तृणमूलच्या अध्यक्ष कधी कधी नागरिकांची आणि शरणार्थींची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात. मात्र हे मी स्पष्ट करू इच्छितो की, सीएएला लागू करण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. आमचा पक्ष सीएए लागू करण्यास कटिबद्ध आहे, असे शहा यावेळी म्हणाले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
210,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा