26 C
Mumbai
Sunday, March 1, 2026
घरविशेषहुतात्मा एएसपी आकाश गिरपूंजे यांचा बदला! दोन नक्षल्यांचा खात्मा!

हुतात्मा एएसपी आकाश गिरपूंजे यांचा बदला! दोन नक्षल्यांचा खात्मा!

एकावर पाच लाखांचे बक्षीस असल्याची माहिती

Google News Follow

Related

छत्तीसगडमधील सुकमा येथील कुकानार पोलीस स्टेशन परिसरात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये भीषण चकमक झाल्याचे वृत्त आहे. नक्षलवाद्यांनी नुकताच आयईडी स्फोट घडवून आणला होता, ज्यामध्ये एएसपी आकाश राव गिरपुंजे हुतात्मा झाले. या घटनेनंतर संपूर्ण जिल्ह्यात सुरक्षा दलांकडून शोधमोहीम सुरु करण्यात आली. सुरक्षा दलाच्या कारवाईत दोन नक्षलवादी ठार झाल्याचे समोर आले आहे. घटनास्थळावरून स्वयंचलित शस्त्रे आणि नक्षलवादी साहित्य देखील जप्त करण्यात आले आहे.

सुकमा जिल्ह्यातील कुकनार पोलीस स्टेशन परिसरातील जंगलात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत दोन नक्षलवादी ठार झाल्याचे सुकमाचे एसपी किरण चव्हाण यांनी सांगितले. घटनास्थळावरून स्वयंचलित शस्त्रे देखील जप्त करण्यात आली आहेत. चकमक आणि शोध मोहीम सुरू आहे. ठार झालेल्या दोन नक्षलवाद्यांमध्ये एक नक्षली महिलेचा समावेश आहे.

ठार झालेल्या नक्षलवाद्यांपैकी एकाची ओळख पटली असून तो पेद्रास येथील स्थानिक संघटना पथकाचा (एलओएस) कमांडर बामन आहे, ज्याच्या डोक्यावर ५ लाख रुपयांचे बक्षीस होते. चकमकीनंतर सापडलेल्या महिला नक्षलवादी कॅडरची ओळख अद्याप पटलेली नाही.

हे ही वाचा : 

ठाणे मनपा ऍथलेटिक्स प्रशिक्षण योजनेच्या खेळाडूंनी सोने लुटले

ज्योती मल्होत्राचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला!

भारताने केलेल्या वस्त्रहरणानंतर पाकिस्तानने ‘झाकली’ लाज

राजा रघुवंशीच्या हत्येच्या कटात सहभागी असल्याची सोनमची कबुली, पुरावे पाहून रडली!

चकमकीच्या ठिकाणाहून एक इन्सास रायफल, एक १२ बोर रायफल, तसेच इतर शस्त्रे, दारूगोळा आणि स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. अतिरिक्त सहाय्यक पथके तैनात करण्यात आली आहेत आणि पळून गेलेल्या इतर माओवादी कॅडरना शोधण्यासाठी आणि त्यांना पकडण्यासाठी आजूबाजूच्या घनदाट जंगलात सखोल शोध मोहीम सुरू आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
296,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा