27 C
Mumbai
Sunday, September 15, 2024
घरविशेषमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पूरग्रस्त भागाची पाहणी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पूरग्रस्त भागाची पाहणी

पुराचा धोका कायमस्वरुपी दूर करण्याकरीता नवीन धोरण आणण्यात येईल- मुख्यमंत्री

Google News Follow

Related

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे शहरातील पूरग्रस्त भागाची पाहणी करून पूरबाधित नागरिकांशी संवाद साधल. पुराचा धोका कायस्वरुपी दूर करण्याकरीता तसेच पूरपरिस्थितीच्या अनुषंगाने निर्माण होणाऱ्या समस्येवर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी शासनाच्यावतीने नवीन धोरण आणण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.

शिंदे यांनी पाटील इस्टेट शिवाजीनगर व डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक विद्यालय पीएमसी कॉलनी, वाकडेवाडी, जुनी सांगवी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मनपा शाळा, एकता नगर सिंहगड रोड, खडकवासला येथे भेट देऊन रहिवासी तसेच स्थलांतरित नागरिकांशी संवाद साधला.

हेही वाचा..

आसामनेही मनावर घेतले… आता लाडक्या बहिणींसाठी लव्हजिहाद विरोधी कायदा हवा!

बांगलादेशात आंदोलकांनी ‘बंगबंधू शेख मुजीबुर रहमान’ यांचा पुतळा फोडला !

बांगलादेशातील सत्तापालटानंतर बीएसएफकडून सर्व सीमेवर ‘हाय अलर्ट’

गणपतीसाठी चाकरमान्यांचा एसटीला उदंड प्रतिसाद !

यावेळी आरोग्यमंत्री डॉ.तानाजी सावंत, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार भीमराव तापकीर, माधुरी मिसाळ, विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ.राजेंद्र भोसले, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, पुण्यात निर्माण झालेल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर निळ्या पूररेषेचे फेरसर्वेक्षण करण्यात येईल. पूरबाधित नागरिकांना शासनाच्यावतीने आवश्यक ती मदत करण्यात येत आहे. परंतु, पुराचा धोका कायस्वरुपी कमी करण्याकरीता शासनाच्यावतीने उपाययोजना करण्यात येईल. पुरबाधित घराचा प्रश्न मार्गी लावण्याकरीता नवीन विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली (डीसीआर) तयार करण्यात येईल, घराच्या पुर्नविकासकरीता आवश्यकतेनुसार कायद्यात व नियमातही बदल करण्यात येईल, असे आश्वासन श्री. शिंदे यांनी दिले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जुनी सांगवी परिसरातील स्थलांतरित पूरबाधित नागरिकांची पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मनपा शाळेत भेट घेऊन त्यांना दिलासा दिला. शासनाकडून सर्व आवश्यक ती मदत करण्यात येत असून बाधित क्षेत्रातील नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यात येईल असे ते यावेळी म्हणाले.यावेळी पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त श्री. सिंह यांनी पूरग्रस्तांसाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

सिंहगड रोडवरील एकता नगर येथील पूरग्रस्त नागरिकांसाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देऊन पाहणी केली तसेच सुमारे दीड तास नागरिकांची विचारपूस करून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. प्रत्येक नागरिकाचा जीव महत्त्वाचा असून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सर्व आवश्यकता उपाययोजना करण्यात येतील अशी ग्वाही त्यांनी दिली.

त्यानंतर या भागातील गटार लाईनची दुरुस्ती, पाण्याची नवीन लाईन टाकणे आदी पायाभूत सुविधा नागरिकांना पुरवाव्यात, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी पुणे महानगर पालिका आयुक्तांना दिले. पूरबाधित भागातील विविध भागात मदत कक्ष सुरू करण्यात आले असून आरोग्य पथके आणि जवळपासची रुग्णालये सज्ज ठेवावीत आदी सूचना त्यांनी दिल्या. त्यानंतर खडकवासला धरणाच्या बॅक वॉटरची त्यांनी अधिकाऱ्यांसह पाहणी केली. शिंदे यांच्या हस्ते पूरबाधित नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
177,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा