31 C
Mumbai
Tuesday, June 2, 2026
घरविशेषव्यावसायिक एलपीजी पुन्हा महागला; कोणत्या शहरात काय आहेत दर?

व्यावसायिक एलपीजी पुन्हा महागला; कोणत्या शहरात काय आहेत दर?

१९ किलोच्या कमर्शियल एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत ४२ रुपयांची वाढ

Google News Follow

Related

व्यावसायिक एलपीजी सिलेंडर (कमर्शियल) दरांमध्ये पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. सोमवारपासून लागू झालेल्या नव्या दरांनुसार, दिल्लीत १९ किलोच्या कमर्शियल एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत ४२ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे या सिलिंडरची किंमत आता ३,११३.५० रुपये झाली आहे. कोलकात्यात याहून अधिक वाढ करण्यात आली असून, तेथे ५३.५० रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे १९ किलोच्या कमर्शियल सिलिंडरची किंमत ३,२५५.५० रुपये इतकी झाली आहे.

इंधन आणि वाहतूक खर्चात झालेल्या वाढीमुळे ही दरवाढ करण्यात आल्याचे तेल विपणन कंपन्यांनी म्हटले आहे. तसेच पाच किलोच्या फ्री ट्रेड एलपीजी (FTL) सिलिंडरच्या किंमतीतही ११ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. दिल्लीत आता पाच किलोच्या एफटीएल सिलिंडरची किंमत ८२१.५० रुपये झाली आहे. मात्र, घरगुती वापराच्या एलपीजी सिलिंडरच्या दरांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नसल्याने सर्वसामान्य ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

जानेवारी महिन्यात दिल्लीत १९ किलोच्या कमर्शियल एलपीजी सिलिंडरची किंमत १,६९१.५० रुपये होती. त्यानंतर दरमहा झालेल्या वाढीनंतर आता ती ३,११३.५० रुपये झाली आहे. म्हणजेच अवघ्या पाच महिन्यांत सिलिंडरच्या किंमतीत १,४०० रुपयांहून अधिक वाढ झाली आहे. फेब्रुवारीमध्ये कमर्शियल एलपीजीच्या दरात ४९ रुपयांची वाढ करण्यात आली होती. त्यानंतर मार्चमध्ये ११५ रुपयांची वाढ झाली. एप्रिलमध्ये तब्बल ९९३ रुपये प्रति सिलिंडर इतकी सर्वात मोठी वाढ करण्यात आली होती. आता जूनच्या सुरुवातीलाही दरवाढ करण्यात आली आहे.

नवीन दरांनुसार विविध शहरांमधील १९ किलो कमर्शियल सिलिंडरच्या किंमती पुढीलप्रमाणे आहेत:

  • मुंबई: ३,०२४.५० रुपये
  • चेन्नई: ३,२३२ रुपये
  • हैदराबाद: ३,२९४ रुपये
  • पटना: ३,३२२ रुपये

हे ही वाचा:

पहलगाम हल्ल्याआधीच सक्रिय झाले फोन; पाकिस्तानी बँकेचे कनेक्शन

खेळाडूंना घेऊन हॉटेलकडे निघालेल्या गुजरात टायटन्सच्या बसला आग

‘दोन्ही देशांनी एकमेकांच्या भूभागावर अतिक्रमण केले’; नेपाळच्या पंतप्रधानांचा दावा

धारधार युक्तिवाद करणारा, संवेदनशील माणूस…

याआधी दिल्ली आणि आसपासच्या भागात कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (CNG) च्या दरांमध्येही प्रति किलो 2 रुपयांची वाढ करण्यात आली होती. १५ मेपासून चार टप्प्यांत सीएनजीच्या दरात एकूण ६ रुपयांची वाढ झाली आहे. अलीकडच्या आठवड्यांत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्येही वाढ झाली आहे. पेट्रोलच्या दरात ७.३५ रुपये प्रति लिटर, तर डिझेलच्या दरात ७.५३ रुपये प्रति लिटर इतकी वाढ करण्यात आली आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
310,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा