31 C
Mumbai
Sunday, May 26, 2024
घरविशेषहेमा मालिनी यांच्यावर टीका करणाऱ्या काँग्रेस खासदाराला दोन दिवस प्रचार करण्यास मज्जाव!

हेमा मालिनी यांच्यावर टीका करणाऱ्या काँग्रेस खासदाराला दोन दिवस प्रचार करण्यास मज्जाव!

निवडणूक आयोगाचे आदेश

Google News Follow

Related

भाजप खासदार हेमा मालिनी यांच्याविरुद्ध केलेल्या कथित अपमानास्पद वक्तव्याबद्दल भारतीय निवडणूक आयोगाने मंगळवारी ज्येष्ठ काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांना निवडणूक प्रचारावर बंदी घातली आहे. या आदेशानुसार, सुरजेवाला मंगळवार संध्याकाळी सहा वाजल्यापासून पुढील ४८ तास निवडणूक रॅली किंवा जाहीर सभा घेऊ शकत नाहीत.

‘हरियाणामध्ये झालेल्या निवडणूक प्रचारादरम्यान त्यांनी केलेल्या चुकीच्या विधानाचा तीव्र निषेध निवडणूक समितीकडून केला जात असून आणि गैरवर्तनाबद्दल रणदीप सुरजेवाला यांना समज दिली जात आहे,’ असे निवडणूक समितीने नोटिशीमध्ये नमूद केले आहे. त्यामुळे भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद ३२४ अन्वये रणदीप सुरजेवाला यांना १६ एप्रिल संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते ४८ तासांपर्यंत कोणत्याही सार्वजनिक सभा, सार्वजनिक मिरवणुका, सार्वजनिक रॅली, रोड शो आणि मुलाखती घेण्यापासून, प्रसारमाध्यमांमध्ये सार्वजनिक वक्तव्ये करण्यापासून प्रतिबंधित करण्यात आले आहे, असे नमूद करण्यात आले आहे.रणदीप सुरजेवाला हे पहिले राजकारणी ठरले आहेत, ज्यांना २०२४च्या लोकसभा निवडणुकीत मतदान पॅनेलने बंदी घातली आहे.

हे ही वाचा:

दुबईत मुसळधार पावसाने पूरस्थिती; गाड्या, बस रस्त्यांवर अडकल्या!

सन २०३०पर्यंत भारत कचरामुक्त अंतराळ मोहिमा करणार!

ओपिनियन पोलनुसार लोकसभा निवडणुकीत नऊहून अधिक राज्यात काँग्रेसचा सुपडा साफ होणार

रामनवमी: रावणाच्या अत्याचारातून मुक्तीसाठी भगवान विष्णूंचा सातवा अवतार

हेमा मालिनी यांच्याबद्दल काही आक्षेपार्ह टिप्पणी करताना सुरजेवाला यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केल्यानंतर राजकीय वादाला तोंड फुटले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि शेहजाद पूनावाला यांच्यासह अनेक भाजप नेत्यांनी सुरजेवाला यांच्यावर जोरदार टीका केली आणि म्हटले की, आगामी लोकसभा निवडणुकीत महिला त्यांना कठोर धडा शिकवतील.

सुरजेवाला यांना मालिनी यांच्या विरोधात कथित असभ्य टिप्पणी केल्याने निवडणूक समितीने कारणे दाखवा नोटीसही बजावली होती. तथापि, काँग्रेस नेत्याने हे आरोप फेटाळून लावून भाजपने शेअर केलेला व्हिडिओ संपादित आणि विकृत करण्यात आला होता आणि हेमा मालिनी यांचा अपमान करण्याचा किंवा दुखावण्याचा त्यांचा कधीही हेतू नव्हता, असे स्पष्ट केले आहे.

आपली भूमिका स्पष्ट करताना, सुरजेवाला यांनी त्याच व्हिडिओमधील आणखी एक क्लिपिंग शेअर केली आहे. ज्यामध्ये ते हेमा मालिनीचा आदर करतात. कारण त्या धर्मेंद्र यांच्या पत्नी असून आमची सून आहे, असे म्हणत आहेत.
‘माझा हेतू हेमा मालिनीजींचा अपमान करण्याचा किंवा कोणाला दुखवण्याचा नव्हता. म्हणूनच मी स्पष्टपणे म्हटले आहे की आम्ही हेमा मालिनीजींचा आदर करतो. भाजप महिलाविरोधी आहे, त्यामुळे ते सर्व काही आपल्या भ्रष्ट चष्म्यातून पाहते आणि सोयीस्करपणे खोटे पसरवते,’ असे सुरजेवाला यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
156,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा