25 C
Mumbai
Wednesday, March 29, 2023
घरविशेषमराठी चित्रपटसृष्टीच्या मनोरंजनाचा 'दादा' माणूस

मराठी चित्रपटसृष्टीच्या मनोरंजनाचा ‘दादा’ माणूस

आज त्यांचा पंचविसावा स्मृतिदिन

Google News Follow

Related

कुटुंबातील काही सदस्यांचा अपघात झाला त्यात फक्त मी आणि माझा भाऊ वाचला पण त्या अपघातानंतर माझे बोलणे, खाणे पिणे सगळेच बंद होऊन माझी प्रकृती खूप बिकट झाली तेव्हा मला वाटले कि आता मी वेडा होईन देवाने माझ्या बरोबर असे का केले? आणि त्याचवेळी मी ठरवले कि माझे दुःख विसरून लोकांना फक्त हसवायाचे आणि म्हणून मी कॉमेडी करायला लागलो. हे म्हंटले आहे मराठी चित्रपट सृष्टीतील  प्रसिद्ध सुपरस्टार अभिनेते, निर्माते, दादा कोंडके यांनी म्हंटले आहे. लहानपणी एका ज्योतिषाने भाकीत केले होते कि, हा आयुष्यात कधीच सफल होणार नाही कायम अपयशी राहणार पण दादांना त्यांच्या कामामुळे कायम यशच नाही मिळाले तर त्यांनी यशाची अनेक उत्तुंग शिखरे सर केली.

दादा कोंडके यांना आज जाऊन तब्बल २५ वर्षे झाली पण त्यांच्या कामातून आजही त्यांचा ठसा आपल्याला जाणवत आहे. १९६९ साली भालजी पेंढारकर यांनी त्यांना ‘तांबडी माती’ या चित्रपटांत काम करण्याची संधी दिली आणि त्यांना पहिला राष्ट्रीय पुरस्कार पण मिळाला. १९७१ मध्ये दादानी सोंगाड्या चित्रपटाची निर्मिती केली. आणि प्रमुख भूमिका पण केली. सुरवातीच्या काळांत त्यांनी किराणा दुकानात ६० रुपये पगारावर काम करण्यास सुरवात केली. काही वेळ ते एका बँड मध्ये सुद्धा नोकरी करत होते. तिकडेच त्यांनी स्टेजवर परफॉर्म करायला सुरवात केली. त्यानंतर चित्रपटात काम करून सुद्धा त्यांनी आपल्या जुन्या सहकाऱ्यांबरोबर भेटीगाठी चालू ठेवल्या होत्या.

हे ही वाचा:

ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये आणि या शिवसेनेमध्ये फरक आहे

आपला पाठलाग केला गेला; शीतल म्हात्रेंनी केली तक्रार

शीतल म्हात्रे व्हीडिओप्रकरणी साईनाथ दुर्गे अटकेत

राज्यातील कैद्यांना आता ‘तुुडुंब’वास; सगळ्या तुरुंगात गर्दी

मराठी चित्रपट सृष्टीतले दादा कोंडके हे पहिले अभिनेते होते ज्यांनी आपल्या चित्रपटांमध्ये द्विअर्थी संवाद वापरण्याचे धाडस केले. त्यांच्या चित्रपटांच्या नावांपासून ते गाणी ,संवादापर्यंत सगळे द्विअर्थी होते. पण त्यांना असे चित्रपट प्रदर्शित करण्यास कधीही बंदी घालण्यात आली नव्हती. दादाचे चित्रपट पाहण्यासाठी लोक पुष्कळ गर्दी करत असत. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस् मध्ये दादा कोंडके यांच्या नावावर सर्वाधिक रौप्य महोत्सवी चित्रपट चालण्याचा विक्रम जमा आहे.

दादाचे सलग नऊ चित्रपट सतत २५ आठवडे थिएटर मध्ये चालण्याचा विक्रम दादाच्या नावावर आहे. त्यांचे काही चित्रपट तर ५० आठवडे सुद्धा चालले आहेत. त्यांचे चित्रपट जीवन , त्यांची कारकीर्द जितकी आनंददायी होती तितकेच त्यांचे खाजगी आयुष्य खूप दुःखी होते . आपल्या ‘एकटा जीव’ या आत्मचरित्रामध्ये त्यांनी याची खंत बोलून दाखवत म्हंटले आहे पुढचा जन्म हा एकट्याचा देऊ नकोस.

 

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,876चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
65,600सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा