32 C
Mumbai
Saturday, June 3, 2023
घरविशेषशास्त्रीय नृत्यांगना पद्मा सुब्रमण्यम यांनी सर्वप्रथम पंतप्रधानांना दिली 'सेंगोल'ची कल्पना

शास्त्रीय नृत्यांगना पद्मा सुब्रमण्यम यांनी सर्वप्रथम पंतप्रधानांना दिली ‘सेंगोल’ची कल्पना

त्यांच्या पत्रामुळे पुढील पावले उचलली गेली आणि आता नवीन संसद भवनात हा सेंगोल विराजमन होणार आहे.

Google News Follow

Related

शास्त्रीय नृत्यांगना डॉ. पद्मा सुब्रह्मण्यम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना २०२१ मध्ये पत्र लिहिले होते. त्यात त्यांनी एका तमिळ मासिकातील लेखाचा हवाला देऊन १९४७ मध्ये ब्रिटनकडून भारताला सत्ता हस्तांतरित करताना सेंगोलचा समावेश असलेल्या समारंभाचा तपशील दिला होता. त्यांनी पाठवलेल्या पत्रामुळे पुढील पावले उचलली गेली आणि आता नवीन संसद भवनात हा सेंगोल विराजमन होणार आहे.

प्रख्यात शास्त्रीय नृत्यांगना पद्मा सुब्रह्मण्यम यांनी सन २०२१मध्ये सेंगोलवरील तामिळ लेखाचे भाषांतर करून पंतप्रधान कार्यालयाला पत्र लिहिले होते. दोन वर्षांनंतर, २८ मे रोजी अलाहाबाद संग्रहालयाच्या नेहरू गॅलरीतून हा सोन्याचा राजदंड दिल्लीला संसदेच्या नवीन इमारतीत स्थापनेसाठी हलवण्यात आला.

“तो एक तमिळमधला लेख होता जो थुगलक नियतकालिकामध्ये प्रकाशित झाला होता. यात सेंगोलबद्दल लिहिलेल्या मजकुराचे मला खूप आकर्षण वाटले. चंद्रशेखरेंद्र सरस्वती यांनी त्यांचे शिष्य डॉ सुब्रमण्यम यांना १९७८मध्ये सेंगोलबद्दल कसे सांगितले, हे त्यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये लिहिले आहे, याबद्दल हा लेख आहे,” असे डॉ. पद्मा सुब्रह्मण्यम म्हणाल्या. त्या पुढे म्हणाल्या, ‘तमिळ संस्कृतीत सेंगोलला खूप महत्त्व आहे. छत्री, सेंगोल आणि सिंहासन या तीन वस्तू आहेत ज्या आपल्याला राजाच्या राज्यशक्तीची कल्पना देतात. सेंगोल हे शक्तीचे, न्यायाचे प्रतीक आहे. हे केवळ एक हजार वर्षांपूर्वी आलेले नाही. चेरा राजांच्या संदर्भात तमिळ महाकाव्यातही त्याचा उल्लेख आहे.’

त्यांना सेंगोल शोधण्यात रस कसा निर्माण झाला, याबद्दलही त्यांनी सांगितले. ‘हे सेंगोल कुठे आहे, हे जाणून घेण्यात मला रस होता. पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना सादर करण्यात आलेला सेंगोल पंडितजींचे जन्मस्थान असलेल्या आनंद भवनात ठेवण्यात आल्याचे मासिकाच्या लेखात म्हटले आहे. ते तिथे कसे गेले आणि नेहरू आणि सेंगोलचे नाते काय होते, हेदेखील खूप मनोरंजक आहे,’ असे सांगत त्यांनी यावर अधिक प्रकाश टाकला.

हे ही वाचा:

संसद भवनाच्या उद्घाटनाविरोधातली याचिका फेटाळत न्यायालयाने ओढले ताशेरे

त्याने तब्बल ९४ हजार एमपीएससी हॉल तिकिटे हॅक केली!

‘१ जूनपासून वीजबिल भरू नका’ : कर्नाटकच्या भाजप खासदाराचे आवाहन

इंग्रजांनी बांधलेल्या जुन्या संसद भवनाचे काय होणार?

सन १९४७मध्ये ब्रिटिशांकडून भारतात सत्ता हस्तांतरित करताना पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना सेंगोल (राजदंड) सुपूर्द करणे, हे या महत्त्वपूर्ण प्रसंगाचे प्रतीक होते. सी राजगोपालचारी यांच्या विनंतीवरून तामिळनाडू (तत्कालीन मद्रास प्रेसिडन्सी) मधील तिरुवावदुथुराई अधिनाम यांना (तमिळनाडूमधील शैव मठातील पुजारी) सत्ता हस्तांतरण सूचित करण्यासाठी भव्य पाच फूट लांबीचे सेंगोल तयार केले होते.

अधीनामच्या पुजाऱ्यांनी वुम्मीदी बंगारू चेट्टी यांच्या कुटुंबाला हे संगोल तयार करण्याची जबाबदारी सोपवली होती. अधीनामचे मुख्य पुजारी श्री कुमारस्वामी थंबीरन यांना सेंगोलसह दिल्लीला जाऊन समारंभ आयोजित करण्याचे काम देण्यात आले होते. त्यांनी सेंगोल लॉर्ड माउंटबॅटन यांच्याकडे सोपवले, त्यांनी ते परत दिले. सेंगोलवर पवित्र पाणी शिंपडून शुद्ध केले गेले. त्यानंतर समारंभ आयोजित करण्यासाठी आणि सेंगोल नवीन शासकाकडे सोपवण्यासाठी नेहरूंच्या निवासस्थानी नेण्यात आले. त्यानंतर मात्र सेंगोल दिसला नाही.

‘स्वातंत्र्याची ७५ वर्षे साजरी करत असताना, या समारंभांची पुनरावृत्ती केल्यास खूप छान होईल, असे वाटल्याने मी पंतप्रधानांना पत्र लिहिले होते,’ असे पद्मा सुब्रह्मण्यम म्हणाल्या. २८ मे रोजी हा राजदंड नवीन संसद भवनात स्थानापन्न होत असल्याने पद्मा खूप खूष आहेत. यामुळे आपल्या खासदारांना देशाची सेवा करण्याची प्रेरणा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. “सेंगोल सर्व तमिळींच्या परिचयाचे आहे. आता इथे राजेशाही नसल्याने संगोलचे महत्त्व विस्मृतीत गेले. मला वाटते, सेंगोलची ही संकल्पना केवळ तामिळनाडूच नव्हे तर संपूर्ण भारतात होती. परंतु दक्षिणेने हा वारसा आणि परंपरा जपला,’ असे त्या म्हणाल्या.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,851चाहतेआवड दर्शवा
2,022अनुयायीअनुकरण करा
76,400सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा