30 C
Mumbai
Sunday, May 12, 2024
घरविशेषफाशी प्रकरणी कतारमधील नौसैनिकांना भारतीय राजदूत भेटले!

फाशी प्रकरणी कतारमधील नौसैनिकांना भारतीय राजदूत भेटले!

नौसैनिकांच्या फाशीच्या शिक्षेवर पंतप्रधान मोदींची अमीर शेख तमीम बिन हमाद अल-थानी यांची झाली होती चर्चा

Google News Follow

Related

कतारमध्ये ८ भारतीय माजी नौसैनिकांना फाशीची शिक्षा सुनावल्याप्रकरणी मोठे यश मिळाले आहे. या प्रकरणात भारतीय राजदूताला कॉन्सुलर ऍक्सेस मिळाला आहे.हा एक संवेदनशील मुद्दा आहे. भारतीय राजनयिकाने या लोकांची भेट घेऊन त्यांना या प्रकरणाची माहिती दिली आहे. याप्रकरणी दोनदा सुनावणी झाली असून, पुढील सुनावणी लवकरच होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

यूएन क्लायमेट समिट व्यतिरिक्त पीएम मोदी दुबईला पोहोचले तेव्हा त्यांनी कतारचे अमीर शेख तमीम बिन हमाद अल-थानी यांचीही भेट घेतल्याचे समोर आले आहे. यावेळी दोघांमध्ये चांगलीच चर्चा झाली. याच बैठकीत आठ माजी नौसैनिकांच्या शिक्षेवरही चर्चा झाली, त्यानंतर आता त्यांना राजनैतिक प्रवेश दिला जाणार असल्याचे बोलले जात आहे.

हे ही वाचा:

हास्यजत्रा फेम प्रसाद खांडेकरची अधिवेशनात ‘एन्ट्री’!

करणी सेनाप्रमुखाच्या हत्येप्रकरणी दोन पोलिस निलंबित

मद्य कंपनीवर धाड, नोटा मोजता मोजता यंत्रे बिघडली!

केसीआर यांना धोबीपछाड देणाऱ्या काँग्रेसच्या रेवंथ रेड्डींनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ

 

या प्रकरणी भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, आम्ही या प्रकरणावर बारकाईने लक्ष ठेवून आहोत.सर्व कायदेशीर बाबी प्रदान केले जात आहे.दरम्यान, आमचे राजदूत तुरुंगात त्या सर्व ८ जणांना भेटले होते. आम्ही या प्रकरणावर बारकाईने लक्ष ठेवून आहोत, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. सर्व कायदेशीर आणि वाणिज्य सहाय्य प्रदान केले जात आहे. दरम्यान, आमचे राजदूत तुरुंगात त्या सर्व ८ भारतीय माजी नौसैनिकांना भेटले असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आले.

दरम्यान, गेल्या वर्षी कतारमध्ये अटक करण्यात आलेल्या आठ माजी भारतीय नौदलाच्या कर्मचाऱ्यांना कतार न्यायालयाने २७ ऑक्टोबर २०२३ रोजी फाशीची शिक्षा सुनावली होती. गेल्या महिन्यात असे समोर आले होते की, कतार न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावलेल्या भारतीय नौदलाच्या माजी कर्मचार्‍यांचे अपील स्वीकारले असून या प्रकरणाची पुढील सुनावणी लवकरच होणार आहे.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
152,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा