30 C
Mumbai
Friday, June 21, 2024
घरविशेषशपथविधीच्या पार्श्वभूमीवर दिल्ली हाय अलर्टवर; परिसर नो फ्लाय झोन घोषित

शपथविधीच्या पार्श्वभूमीवर दिल्ली हाय अलर्टवर; परिसर नो फ्लाय झोन घोषित

नरेंद्र मोदी हे एनडीए सरकारमध्ये रविवार, ९ जून रोजी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार

Google News Follow

Related

भाजपा नेते नरेंद्र मोदी हे एनडीए सरकारमध्ये रविवार, ९ जून रोजी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. नरेंद्र मोदींच्या शपथविधीचा भव्य असा कार्यक्रम पार पडणार आहे. नरेंद्र मोदींच्या शपथविधीच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय पातळीवर घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रपती कार्यालयाकडून मोदींच्या शपथविधीच्या कार्यक्रमासाठी तयारी सुरु झाली आहे. विशेष म्हणजे सुरक्षेच्या दृष्टीने अनेक हालचाली या भागात सुरू आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी रविवारी दिल्लीत हाय अलर्ट राहणार आहे. दिल्ली पोलिसांच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या कार्यक्रमासाठी राष्ट्रपती भवनात निमलष्करी दलाचे कर्मचारी, NSG कमांडो, ड्रोन आणि स्नायपर्सच्या पाच कंपन्यांसह बहुस्तरीय सुरक्षा असणार आहे.

नरेंद्र मोदी ज्या दिवशी शपथ घेतील त्या दिवशी या परिसरात विमानांना हवेत घिरट्या घेण्यास बंदी असणार आहे. तसेच नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत कलम १४४ लागू करण्यात आलं आहे. मोदींच्या शपथविधीआधी नो फ्लाय झोन घोषित करण्यात आलं आहे. नरेंद्र मोदी ९ जूनला संध्याकाळी ७ वाजून १५ मिनिटांनी पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. मोदींच्या शपथविधीच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारी करण्यात आली आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शपथविधी सोहळ्याला उपस्थित असलेल्या मान्यवरांना त्यांच्या हॉटेल्सपासून कार्यक्रमस्थळापर्यंत आणि परत जाण्यासाठी नियुक्त मार्ग दिले जाणार आहेत. तसेच या मार्गांवर स्नायपर आणि सशस्त्र पोलीस कर्मचारी असणार आहेत. शिवाय ड्रोन तैनात राहतील. दिल्लीत मोक्याच्या ठिकाणीही ड्रोन तैनात केले जातील.

हे ही वाचा:

‘ईव्हीएम’ जिवंत आहे की मेली?, मोदींचा इंडी आघाडीवर निशाणा!

एनडीएच्या बैठकीत नरेंद्र मोदी संविधानापुढे झाले नतमस्तक!

पाकिस्तानविरोधातील अमेरिकेच्या विजयाचा शिल्पकार; सौरभ नेत्रावलकर आहे तरी कोण?

टी२० विश्वचषक स्पर्धेत अमेरिकेकडून पाकिस्तानला पराभवाचा धक्का!

या शपथविधी सोहळ्याला बांगलादेश, श्रीलंका, मालदीव, भूतान, नेपाळ, मॉरिशस आणि सेशेल्सचे प्रमुख नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. यासाठी शहरातील हॉटेल्स जसे लीला, ताज, आयटीसी मौर्य, क्लेरिजेस आणि ओबेरॉय हे आधीच सुरक्षा कवचाखाली आणले आहे. दिल्ली पोलिसांचे SWAT (विशेष शस्त्रे आणि रणनिती) आणि NSG चे कमांडो कार्यक्रमाच्या दिवशी राष्ट्रपतींच्या घराभोवती आणि विविध मोक्याच्या ठिकाणी तैनात राहतील.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
161,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा