31 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
घरविशेषजनशताब्दीतील आसनांनी प्रवाशांची ‘पाठ’ धरली

जनशताब्दीतील आसनांनी प्रवाशांची ‘पाठ’ धरली

सीटच्या आकारामुळे कंबर दुखीचा त्रास; तीन सीटच्या आसनावर बसणेही अवघड

Google News Follow

Related

कोकणात जाण्यासाठी कोकण वासियांसाठी जलद प्रवास आणि तेही स्वस्तात कोकणात पोहोचायचे म्हणजे चांगला पर्याय म्हणजे हमखास मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस. तुम्ही सकाळचा चहा घेऊन प्रवास करून जेवण्यासाठी आपल्या घरी पोहोचता, इतका सुसाट हा प्रवास. पण हा प्रवास सेकंड सीटिंगच्या प्रवाशांना तापदायक व्हायला लागला आहे. त्याचे कारण म्हणजे या गाडीतील आसन. या आसनामुळे प्रवाशांना हा प्रवास नकोसा व्हायला लागला आहे. या बोगीमध्ये एका बाजूला दोन तीन आणि दुसऱ्या बाजूला तीन सीट अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे. खरंच या सीटवर तीन व्यक्ती बसण्यासाठी बसणे अवघड होऊन जाते. सगळ्यात बेकार आसन व्यवस्था या जनशताब्दीची आहे, असे लोकांचे म्हणणे आहे. या सीटच्या आकारामुळे कंबर दुखीचा त्रास प्रवाशांना व्हायला लागला आहे. म्हणजे या रेल्वेने प्रवास करताना सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही, अशी काहीशी स्थिती कोकणवासियांची झालेली आहे.

त्यात अजून भर म्हणजे मडगावहून सुटणाऱ्या या गाडीच्या वेळेत बदल करण्यात आलेला आहे. त्यामुळे ही गाडी विलंबाने मुंबईत पोहोचत आहे. कित्येकदा ही गाडी विलंबाने मुंबईत पोहोचत आहे. ही गाडी लेट झाल्यामुळे आसनव्यवस्थेचा आणखी त्रास सहन करावा लागतो आहे. या गाडीतून प्रवास करणारे बहुतेक प्रवाशी आपल्या आपल्या इच्छुक स्थळी पोहोचण्यासाठी लोकल रेल्वेचा उपयोग करतात. परंतु ही गाडी उशीरा पोहोचल्याने त्यांना सकळच्या गाडीची वाट पाहात ताटकळत बसावे लागते. म्हणजे गाडीत बसण्याचा त्रास आणि गाडी उशीरा पोहोचल्याने रात्र जागवत वाट पाहण्याचा त्रास.

हेही वाचा :

शंभू बॉर्डरवर तैनात असलेल्या सब इन्स्पेक्टरचा मृत्यू

युक्रेनचे अवदिवका शहर रशियाच्या ताब्यात

दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियममधील मंडप कोसळून आठ जण जखमी

“पूर्वी मातोश्रीतून वाघाची डरकाळी ऐकू यायची; आता रडगाणी ऐकू येतात”

किफायतशीर रकमेमध्ये त्रासविरहीत प्रवास व्हावा यासाठी सामान्य प्रवाशी रेल्वे प्रवासाला प्राधान्य देत असतात. मात्र प्रवाशांना बसण्यासाठीची व्यवस्था ही तकलादू असल्यामुळे अखंड प्रवासात त्यांना शारीरीक त्रास झेलावा लागतो. तसंच रेल्वे स्थानकात रेल्वे येणे आणि इच्छित स्थळी रेल्वे पोहोचणे याच्या वेळा हल्ली चुकत असल्यामुळे म्हणजेच रेल्वे गाड्या विलंबाने पोहोचत असल्यामुळे प्रवाशांना हा दुसरा मानसिक त्रास सहन करावा लागतो. हा प्रवास नकोसा व्हायला लागला आहे, असे लोक आता म्हणू लागले आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा