37 C
Mumbai
Tuesday, April 16, 2024
घरविशेषआठ वर्षांनी संपुष्टात आला मुंबई रणजी संघाचा दुष्काळ

आठ वर्षांनी संपुष्टात आला मुंबई रणजी संघाचा दुष्काळ

मुंबईने २०१५-१६ मध्ये सौराष्ट्रला हरवून शेवटचे पटकावले होते विजेतेपद

Google News Follow

Related

भारतीय देशांतर्गत क्रिकेटचा दादा संघ अशी मुंबईची ओळख. भारतीय क्रिकेटमध्ये खडूस टीम अशी ओळख मिळवलेल्या मुंबई संघाला मात्र २०१५-१६ च्या हंगामानंतर रणजी करंडक उंचवता आला नाही. मुंबईचा हा दुष्काळ संपलेला आहे. तब्बल ८ वर्षांनंतर मुंबई संघाने रणजी करंडकावर आपले नाव कोरले आहे. मुंबईने २०१५-१६ मध्ये सौराष्ट्रला हरवून शेवटचे विजेतेपद पटकावले होते. मुंबईने फानयलमध्ये गतवेळ चॅम्यिन्स विदर्भावर मात करत विक्रमी ४२ वेळा रणजी करंडकावर आपले नाव कोरले आहे. भारतीय क्रिकेट बोर्डाचे खजिनदार आणि मुंबई भाजपाचे आमदार आशीष शेलार यांच्या हस्ते झळाळता रणजी करंडक मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणे याला प्रदान करण्यात आला. वानखेडे क्रिकेट स्टेडियमवरील या कार्यक्रमाला मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे व सचिव अजिंक्य नाईक उपस्थित होते.

महाराजा रणजित सिंग यांच्या नावाने खेळल्या जाणाऱ्या रणजी करंडकाचा पहिला हंगाम १९३४-३५ मध्ये सुरु झाला. तेव्हापासून मुंबईने ४२ वेळा विजेतेपद पटकावले आहे. मुंबईचा संघ आतापर्यंत केवळ ६ वेळा फायनलमध्ये पराभूत झालेला आहे. याच मुबई संघाने भारताला सुनील गावसकर, सचिन तेंडुलकर, अजित आगरकर, रवी शास्त्री, सध्याचा कर्णधार रोहित शर्मापर्यंत दिग्गज फलंदाज टीम इंडियाला दिले आहेत.

रणजी करंडकाच्या इतिहासाबद्दल बोलायचे झाले तर मुंबईचा क्रिकेट संघ या स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ ठरला आहे. १९३४ पासून सुरु झालेल्या रणजी ट्रॉफी स्पर्धेचे आत्तापर्यंत मुंबई संघाने सर्वाधिक ४२ वेळा विजेतेपद मिळवले आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या कर्नाटकने ८ वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. दिल्लीने ७ वेळा रणजी करंडक पटकावला आहे. सर्वाधिक वेळा रणजी ट्रॉफी मिळवणाऱ्यांच्या यादीत पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावरील संघात ३४ विजेतेपदांचे भलेमोठे इतके अंतर आहे. यावरून मुंबई संघाचा दबदबा समजून येतो. १९५८-५९ ते १९७२-७३ या काळात सलग १५ वेळा मुंबईने या ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे. या स्पर्धेत राज्यांच्या संघासह रेल्वे व आर्मीचाही संघ खेळला आहे. 

आजपर्यंतचे रणजी ट्रॉफी विजेते
४२ – मुंबई
८ – कर्नाटक
७ – दिल्ली
५ – बडोदा
४ – होळकर
२ – हैद्राबाद
२ – बंगाल
२ – महाराष्ट्र
२ – तामिळनाडू
२ – राजस्थान
२ – रेल्वे
२ – विदर्भ
१ – नवानगर
१ – पश्चिम भारत
१ – हरियाणा
१ – पंजाब
१ – युपी
१ – गुजरात
१ – सौराष्ट्र

हेही वाचा :

मुंबईला ४२वे रणजी विजेतेपद, १० कोटींची कमाई

अनिल परबांना दणका; दापोलीमधील साई रिसॉर्ट चार आठवड्यात पाडावे लागणार

पाटणामधील सिव्हील कोर्टात ट्रान्सफॉर्मरचा स्फोट

अश्लील आणि हिंसक कंटेंट दाखविणारे १८ ओटीटी प्लॅटफॉर्म्स ब्लॉक

मुंबईने या हंगामात सात स्पर्धा जिंकण्याचा केला पराक्रम
पुरुष –  १६ वर्षांखालील स्पर्धा
पुरुष – रणजी करंडक
महिला –  १९ वर्षांखालील स्पर्धा
सिनीअर महिला
१४ वर्षांखालील (पश्चिम विभाग अजिंक्यपद)
बापुना चषक
रिलायन्स चषक – १९ वर्षांखालील

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा