22 C
Mumbai
Saturday, December 13, 2025
घरविशेषअनधिकृत मासेमारी नियंत्रण, सागरी सुरक्षेसाठी अंमलबजावणी कक्षाची स्थापना

अनधिकृत मासेमारी नियंत्रण, सागरी सुरक्षेसाठी अंमलबजावणी कक्षाची स्थापना

मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांची माहिती

Google News Follow

Related

राज्याच्या सागरी क्षेत्रामध्ये अनधिकृतपणे परराज्यातील मासेमारी नौकांकडून होणारी मासेमारी थांबवणे आणि सागरी सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी मत्स्यव्यवसाय विभागाकडून स्थापन करण्यात आलेला अंमलबजावणी कक्ष महत्वाची भूमिका बजावेल. तसेच यामुळे सागरी मत्स्योत्पादनामध्ये चांगली वाढ होईल असे प्रतिपादन मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी केले. मंत्रालयात आज राज्याच्या सागरी क्षेत्रात शास्वत मासेमारी टिकून राहण्याकरिता अनधिकृत मासेमारी नौकांवर कठोर कारवाई करण्यासाठी अंमलबजावणी कक्षाची स्थापना झाली, तसेच या कक्षाची बैठक ही झाली. यावेळी मंत्री राणे बोलत होते.

सागरी सुरक्षेसाठी किनारपट्टीच्या भागात ड्रोन द्वारे गस्त सुरु केल्याचे चांगले परिणाम दिसून येत असल्याचे सांगून मंत्री श्री. राणे म्हणाले की, परप्रांतिय मासेमारी नौका राज्याच्या सागरी क्षेत्रात येऊन मासेमारी करतात. त्यामुळे स्थानिक पारंपरिक मच्छिमार यांच्या उत्पादनावर त्याचा विपरीत परिणाम होतो. तसेच एलईडी मासेमारी विषयी कठोर कारवाई करणे आणि स्थानिक पारंपरिक मच्छिमारांचे हित जपणे ही शासनाची भूमिका आहे. त्यानुसार या अंमलबजावणी कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. तसेच सागरी किनाऱ्यांमध्ये आवश्यक असलेल्या साधनसामग्रीची माहिती घेऊन त्याची उपलब्धता सूनिश्चित करण्याचे कामही या कक्षाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. त्यामुळे या कक्षातील सर्वच सदस्यांनी जबाबदारीने आणि सहकार्याने काम करावे अशा सूचना मंत्री राणे यांनी दिल्या.

हेही वाचा..

सत्तेसाठी तुम्ही बाळासाहेबांच्या विचारांना, हिंदुत्वाला डॅमेज केले

संभाजी महाराजांवरील अत्याचार पाहून प्रेक्षक संतापला, मल्टिप्लेक्सची स्क्रीन टराटरा फाडली!

हा गळणाऱ्या पाण्याचा नाही, फुटलेल्या मडक्याचा दोष !

कमाल खान संभाजी महाराजांबद्दल बरळला!

मंत्री राणे म्हणले की, या अंमलबजावणी कक्षाच्या माध्यमातून सागरी किनारी सुरक्षा आणि मासेमारीस एक शिस्त येईल. तसेच अवैध हलचालींवरही नियंत्रण आणणे आणि कडक कारवाई करणे शक्य होणार आहे. प्रत्येकाने नियम पाळले पाहिजेत हीच विभागाची भूमिका आहे. त्यासाठी या अंमलबजावमी कक्षाची भूमिका महत्वाची असणार आहे. तसेच किनाऱ्यांवर झालेले अतिक्रमण हटवण्याची कार्यवाहीही सुरू करण्यात यावी. याबाबतचा कृती आराखडा तयार करून येत्या तीन महिन्यांमध्ये किनारपट्टीच्या मत्स्यव्यवसाय विभागाच्या मालकीच्या सर्व जागा अतिक्रमणमुक्त होतील असे पहावे अशा सूचनाही मंत्री राणे यांनी दिल्या.

मत्स्य व्यवसाय विभागाच्या या अंमलबजावणी कक्षामध्ये मत्स्य व्यवसाय विभागाचे आयुक्त हे अध्यक्ष असणार आहेत. तर पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सात सागरी किनारपट्टीच्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षक आणि मत्स्य व्यवसाय विभागाचे उपसचिव हे सदस्य असणार आहेत. तसेच मत्स्यव्यवसाय (सागरी) सहआयुक्त हे सदस्य सचिव असणार आहेत.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा