29 C
Mumbai
Sunday, March 23, 2025
घरविशेषकमाल खान संभाजी महाराजांबद्दल बरळला!

कमाल खान संभाजी महाराजांबद्दल बरळला!

मुख्यमंत्री फडणवीस यांनी कारवाईचे दिले आदेश

Google News Follow

Related

छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित ‘छावा’ चित्रपटाची डरकाळी संपूर्ण देशात गुंजत आहे. अवघ्या तीन दिवसात चित्रपटाने १०० कोटींचा गल्ला पार करत आताच्या आकडेवारीनुसार चित्रपटाने १४५ कोटींचे कलेक्शन केले आहे. देशभरातून चित्रपटाला उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. छत्रपती संभाजी महाराजांना देण्यात आलेल्या यातना पाहून रसिकांनी डोळ्यात पाणी आणले. चित्रपटगृहातील किंवा चित्रपटगृहातून बाहेर येणाऱ्या रसिकांच्या डोळ्यातून अश्रुच्या धारा वाहात असल्याचे अनेक व्हीडिओ समोर येत आहेत.

याच दरम्यान, छत्रपती संभाजी महाराजांबद्दल कमाल खानने ट्वीटरवर आक्षेपार्ह पोस्ट लिहिल्याचे समोर आले आहे. विकीपीडियाचा आधार घेत कमाल खानने ट्वीट केले होते. मात्र, कमाल खानच्या ट्वीटनंतर सर्व स्तरावरून संताप व्यक्त करत त्याच्यावर टीका केली जात आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आक्रमक झाले आहेत. यासंदर्भात विकीपीडियाशी संपर्क साधून वादग्रस्त मजकूर काढण्याचे सायबर विभागाचे आयजी यशस्वी यादव यांना आदेश दिले आहेत.

हे ही वाचा : 

सिसोदियांनी शासकीय वस्तू चोरल्या

अखिलेश यादव यांचा दुटप्पीपणा उघड; महाकुंभसाठी चुलत बंधूना व्हीआयपी सुविधा

युट्यूबर रणवीर अलाहाबादियाच्या मनात घाण, न्यायालयाने कान उपटले!

कुत्र्यावर खुर्ची उगारणे तरुणाला महाग पडले, एका व्यक्तीने केलेल्या हल्लात अंगठा गमवावा लागला!

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, छत्रपती संभाजी महाराजांबद्दल विकिपीडियावर ज्या पद्धतीने आक्षेपार्ह लिखाण केले गेले आहे. या संदर्भात विकिपीडिया किंवा त्या संबधित यंत्रणा आहे त्यांच्याशी बोलणी करून तो मजकूर हटवण्याचे आदेश सायबर विभागाच्या आयजीना देण्यात आले आहेत.

विकिपीडियावर कोणीही-कशीही माहिती संपादित करू शकत, त्यामुळे अशा पद्धतीचे आक्षेपार्ह लिखाण निघाले पाहिजे. या दृष्टीने कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. प्रत्येकाला अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य आहे, परंतु त्याचीही एक सीमा आहे. दुसऱ्याच्या अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्यावर आपल्या स्वातंत्र्याच्या माध्यमातून घाला घालू शकत नाही. त्यामुळे ज्या ठिकाणी अश्लीलता ही परिसीमेच्या बाहेर जाते तेव्हा कारवाई करणे गरजेचे असते. या संदर्भात नियमावली तयार करण्याबाबत केंद्र सरकार बरोबर चर्चा सुरु आहे, असे मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
237,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा