बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर कर्नाटक भाजपाकडून संताप व्यक्त केला जात आहे. या दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झालेत. दरम्यान, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आरसीबीच्या सत्कार कार्यक्रमासाठी पोहोचण्यापूर्वीच त्यांना मृत्यूची माहिती समजली होती, असा दावा भाजपाने केला आहे.
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते चालुवादी नारायणस्वामी यांनी आरोप केला आहे की, चेंगराचेंगरीमुळे झालेल्या अनेक मृत्यूंची माहिती मिळताच मुख्यमंत्र्यांनी हॉटेलमध्ये जेवण केले आणि बदाम हलवा खाल्ला. “जखमींना भेटण्यासाठी आणि परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी रुग्णालयात धाव घेण्याऐवजी, मुख्यमंत्री बदाम हलवा खाण्यासाठी हॉटेलमध्ये गेले,” असे नारायणस्वामी म्हणाले.
भाजपने कार्यक्रमांचे एक वेळापत्रकही प्रसिद्ध केले आहे. त्यात असा दावा करण्यात आला आहे की खेळाडू कार्यक्रमस्थळी पोहोचण्यापूर्वीच चेंगराचेंगरी सुरू झाली आणि मुख्यमंत्री विधानसौध येथे पोहोचण्यापूर्वीच काहींचा मृत्यू झाला. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना घडणाऱ्या दुर्घटनेची माहिती असूनही कार्यक्रम आयोजित केल, असा आरोप त्यांनी केला.
हे ही वाचा :
मुख्यमंत्री सिद्धारमैया, डी.के. शिवकुमार तत्काळ राजीनामा द्या
भारतीय रेल्वे देशाला ग्रीन फ्युचरकडे नेतेय
पृथ्वीचे रक्षक आणि मानवाचे हे आहेत खास मित्र
भारताचा डिजिटल फॉरेन्सिक बाजार ११,८२९ कोटी रुपयांपर्यंत पोहोचणार
भाजपच्या म्हणण्यानुसार, पहिला मृत्यू, ३२ वर्षीय पूर्णचंद्र, दुपारी ३.४५ वाजता वैदेही रुग्णालयात नोंदवण्यात आला. तर दुसऱ्या एका अज्ञात व्यक्तीला त्याच रुग्णालयात दुपारी ४.०० वाजता मृत घोषित करण्यात आले. कर्नाटक भाजपचे अध्यक्ष बीवाय विजयेंद्र यांनी प्रश्न उपस्थित केला की, मृत्यू आणि जखमींच्या बातम्या येऊ लागल्यावरही सरकारने विधान सौधात उत्सव का साजरा केला?. “खेळाडू ताज वेस्ट एंड हॉटेलमधून बाहेर पडण्यापूर्वीच चिन्नास्वामी स्टेडियमजवळ चेंगराचेंगरी झाली होती,” असे विजयेंद्र म्हणाले.
ते पुढे म्हणाले, “घटनेच्या वेळी रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्यात आली नव्हती. काल घडलेल्या घटनेची संपूर्ण जबाबदारी राज्य सरकारने घेतली पाहिजे. सरकारने न्यायिक चौकशीचे आदेश दिले आहेत, परंतु न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले नाहीत.”
