32 C
Mumbai
Friday, April 26, 2024
घरविशेषसोन्याच्या खरेदीने चेहरे उजळले

सोन्याच्या खरेदीने चेहरे उजळले

सोने खरेदीला तरुणाईचा उत्तम प्रतिसाद

Google News Follow

Related

महाराष्ट्रात सर्वच सणावरील निर्बंध उठवल्यानंतर गणेशोत्सव, नवरात्र, दसरा दणक्यात साजरे करण्यात आले. त्यानंतर आता सर्वत्र दिवाळीच्या खरेदीची लगबग सुरू झाली आहे. त्यातच आता खरेदीच्या उत्साहाने झळाळलेला सुवर्ण बाजार आणि दिव्यांचा आराशित यंदाचा चित्र दिसत आहे. तसेच दिवाळीच्या खरेदीसाठी आठवड्याभरापासून बाजारपेठा गजबजलेल्या आहेत. त्यातच आता शनिवारी खरेदीसाठी अखेरचा दिवस होता. त्यानंतर कुटुंबांसह काही मंडळी मुळगावी किंवा काहीजण सहलीचं आयोजन करतात. त्यामुळे महामार्गावर सुद्धा वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून येते.

कोरोनामुळे नागरिकांना हवी तशी खरेदी करता आलेली नव्हती. त्यामुळे नागरिक मागील दोन वर्षाची कसर भरून काढत असल्याचे यंदाच्या दिवाळीखरेदी मध्ये दिसून येत आहे. तसेच सोन्याच्या दरात प्रति दहा ग्रॅममागे झालेली दीड हजार रुपयांची घसघशीत घटही ग्राहकांच्या विशेष लक्ष वेधून घेत असल्याचे चित्र दिसत आहे. तसेच कोरोनापूर्व सोने खरेदीमध्ये प्रामुख्याने ४५ ये ५० वयोगटातील ग्राहक जास्त महत्त्व देत आहे. पण आता तरुणाईलाही सोन्यात पैसे गुंतवण्याचे महत्त्व कळू लागले आहे. त्यामुळे तरुणाई मोठ्या प्रमाणात १४ ते १८ कॅरेटच्या दागिन्यांसह, रोजगोल्ड, हिरे  खरेदीला प्राधान्य देत असून, तर इतर ग्राहक २२ कॅरेटमधील सोन्याचे हार, बांगड्या, गोठ अशी खरेदी करत असल्याचे दिसून येत आहे.

हे ही वाचा:

शी जिनपिंग तिसऱ्यांदा चीनच्या राष्ट्राध्यक्षपदी

पुणे रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत एकाचा मृत्यू

इस्रोची दिवाळी भेट, सर्वात वजनदार रॉकेटचे पहिले व्यावसायिक प्रक्षेपण यशस्वी

रितेश, जीनिलीयाच्या कंपनीवर मेहेर नजर का?

गेल्या दोन महिन्याच्या तुलनेत धनत्रयेदशीला प्रती दहा ग्रॅम सोन्यामध्ये हजार रुपये घट झाली. त्यामुळे ग्राहकांमध्ये उत्साह आहे. तसेच युवावर्ग ही सोन्याच्या दागिन्यांना ही मोठ्या प्रमाणात पसंती देत आहेत. अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी, पु. ना. गाडगीळ अँड सन्सचे अमित मोडक यांनी दिली. तसेच सोन्याच्या दरामध्ये घट झाली असून, त्याचा सकारात्मक परिणाम ग्राहक संख्येवर ही दिसून येत असून सोने खरेदीला या दिवाळीत उत्साही प्रतिसाद दिसून येत आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा