28.2 C
Mumbai
Thursday, October 8, 2026
घरविशेषप्रसिद्ध कयानी बेकरीवर एफडीएचा दणका!

प्रसिद्ध कयानी बेकरीवर एफडीएचा दणका!

अस्वच्छता आढळल्याने अन्न परवाना निलंबित

Google News Follow

Related

मुंबईतील प्रसिद्ध कयानी बेकरीवर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मोठी कारवाई केली आहे. बेकरीच्या तपासणीदरम्यान अनेक ठिकाणी अस्वच्छता आढळून आल्याने प्रशासनाने बेकरीचा अन्न परवाना निलंबित केला आहे. तसेच पुढील आदेश मिळेपर्यंत बेकरीमध्ये अन्नपदार्थ तयार करणे, साठवणे, विक्री करणे आणि त्याचे वितरण करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

२७ सप्टेंबर रोजी एफडीएच्या अधिकाऱ्यांनी बेकरीची तपासणी केली. यावेळी बेकरीच्या परिसरात मांजर आणि उंदरांची विष्ठा, जिवंत माशा तसेच मृत झुरळे आढळून आल्याचे तपासणीत समोर आले. काही ठिकाणी अन्नपदार्थ योग्य पद्धतीने साठवलेले नव्हते. फ्रिजमध्ये रक्त साचलेले असल्याचेही आढळले. अन्न तयार करण्याच्या भागात उघडे मॅनहोल होते. तसेच अन्नपदार्थ थेट जमिनीवर ठेवण्यात आले होते. कच्चे पीठ वर्तमानपत्राने झाकण्यात आले होते. कच्चे आणि तयार अन्न वेगळे ठेवण्याच्या नियमांचेही पालन झाले नसल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले.
हे ही वाचा:
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण

बॉक्सर अंकुश पंघाल अंतिम फेरीत; नरेंद्रला कांस्यपदक

अँटिलिया प्रकरणातला सूत्रधार सचिन वाझेला जामीन

दहशतवाद या भारताच्या चिंतेची दखल न घेतल्यास संबंधांवर परिणाम

बेकरीतील कर्मचाऱ्यांकडून स्वच्छतेच्या नियमांचे पालन केले जात नसल्याचेही तपासणीत आढळले. अन्न तयार करताना आवश्यक सुरक्षा साधनांचा वापर केला जात नव्हता. या सर्व त्रुटींमुळे अन्नपदार्थांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले. ग्राहकांच्या आरोग्याला धोका होऊ नये, यासाठी एफडीएने तातडीने कारवाई करण्याचा निर्णय घेतला.

कयानी बेकरीसह मुंबईतील आणखी काही हॉटेल, बेकरी आणि खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या आस्थापनांचीही तपासणी करण्यात आली. अस्वच्छता आणि अन्न सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन आढळलेल्या आस्थापनांवर एफडीएकडून कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या व्यावसायिकांनी स्वच्छता आणि अन्न सुरक्षेच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
337,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा