33 C
Mumbai
Sunday, November 15, 2026
घरविशेषदिवाळी हंगामात महाबळेश्वरमधील बड्या हॉटेल्सना एफडीएचा दणका

दिवाळी हंगामात महाबळेश्वरमधील बड्या हॉटेल्सना एफडीएचा दणका

तीन नामांकीत हॉटेल्सचे परवाने निलंबित

Google News Follow

दिवाळीच्या सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत असतानाच, अन्न व औषध प्रशासनाने महाबळेश्वरमधील नामांकित हॉटेल व्यावसायिकांना मोठा दणका दिला आहे. अचानक टाकलेल्या छाप्यात किचनमधील गंभीर अस्वच्छता उघड झाल्याने ३ बड्या हॉटेल्सचे अन्नविक्री परवाने निलंबित करण्यात आले असून, इतर ५ हॉटेल्सना सुधारणा करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. ऐन हंगामात झालेल्या या कारवाईमुळे आगाऊ बुकिंग केलेल्या शेकडो पर्यटकांचे चांगलेच हाल झाले आहेत.

एफडीएचे सहआयुक्त संजय शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने विविध हॉटेल्सच्या किचन आणि रेस्टॉरंटची तपासणी केली. गंभीर त्रुटी आढळलेल्या हॉटेल इव्हरशाईन (महाबळेश्वर), हॉटेल रामसुख (क्षेत्र महाबळेश्वर) आणि हॉटेल ब्राईटलॅण्ड (नाकिंदा) या हॉटेलचे अन्नविक्री परवाने काही दिवसांसाठी निलंबित करण्यात आले आहेत. त्यामुळे संबंधित हॉटेल्सच्या रेस्टॉरंट्सना खाद्यपदार्थ विक्रीचे व्यवहार बंद ठेवावे लागले आहेत.

हे ही वाचा:

पंतप्रधान मोदींनी आदिवासी क्रांतिकारकांना पुन्हा सन्मान प्राप्त करून दिला!

लक्ष्य सेनने जिंकला कुमामोटो मास्टर्सचा किताब

राजस्थान रेल्वे ट्रॅक स्फोटप्रकरणी पाक कनेक्शन उघड!

मुंबईत सीएनजीच्या दरात दीड रूपयांनी वाढ

दिवाळीचा मुख्य हंगाम असल्याने या हॉटेल्समध्ये शेकडो पर्यटकांनी आधीच बुकिंग केले होते. मात्र, अचानक रेस्टॉरंट बंद करावे लागल्याने पर्यटकांची जेवणाची मोठी गैरसोय झाली असून, ऐन सणासुदीत हॉटेल व्यावसायिकांसह पर्यटकांनाही या कारवाईचा मोठा आर्थिक फटका बसला आहे.

 

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा