26 C
Mumbai
Tuesday, September 27, 2022
घरविशेषअखेर १८६६मध्ये बांधलेला कर्नाक पूल पाडण्यास सुरुवात

अखेर १८६६मध्ये बांधलेला कर्नाक पूल पाडण्यास सुरुवात

पुलाच्या जागी नवीन आरोबी पद्धतीने बांधकामाचा आराखडा तयार करण्यात आला आहे

Related

दक्षिण मुंबईतील सीएसएमटी आणि मस्जिद बंदर स्थानकांदरम्यान असलेला ब्रिटीशकालीन कर्नाक पूल पाडण्याचे काम सुरू झाले असून, मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी सांगितले की तो पूर्णपणे पाडण्याचे काम सुमारे तीन महिने लागू शकतात. हा पूल १८६६-६७ मध्ये बांधण्यात आला होता आणि २०१८ मध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बेचे तज्ञ पथकाने तो असुरक्षित असल्याचे घोषित केले होते, तरीही २०१४ मध्येच त्यावरून अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली होती, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्यानी सांगितले.

सिमेंट काँक्रीटचा जाड थर काढण्याचे काम शुक्रवारी पासून सुरू झाले. पॅरापेट, उभ्या स्तंभ आणि गंजलेल्या कुंडाचे काँक्रीट काढून टाकण्याचे काम सुरू होईल, उपनगरीय रेल्वेची वाहतूक असलेल्या रुळांवरून हा पूल जात असल्याने, रात्रीच्या वेळी ते पाडण्याचे काम करतील, रविवारी नियमितपणे चालवल्या जाणार्‍या मेगा ब्लॉगच्या दरम्यान देखील काम करणार असून, पुलाचा गर्डर काढण्यासाठी ३० तासांच्या मेगाब्लॉकचे नियोजन करण्यात आले आहे, त्यानंतर क्रेनच्या सहाय्याने संपूर्ण स्टीलची रचना काढून टाकली जाईल. दक्षिण मुंबईतील पूर्व-पश्चिम जोडणारा संपूर्ण पूल पाडण्यास तीन महिने लागण्याची शक्यता आहे, असे मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्याने सांगितले.

हे ही वाचा:

‘शबाना, नसीरुद्दीन स्लीपर सेल एजंट’

सिनेमांच्या पात्रात श्रीगणेश, मनाला पटते का?

शहेनशाह जहाँ बैठते है, दरबार वही लग जाते है…

पोलीसाच्या मित्रानेच सोनाराला लुटले…

 

गेल्या महिन्यात रेल्वे, वाहतूक पोलिस आणि नागरी अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर हा पूल सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता, मोठ्या प्रमाणात तडे आणि गंज लागल्याचे दिसून आले. मुंबईतील पहिला रेल्वे उड्डाणपूल ब्रिटिशांनी १८६७ साली बांधला होता. कर्णक पूल हा मध्य रेल्वेचा सर्वात जुना आणि सर्वात लहान उड्डाण पूल म्हणून ओळखला जातो. आता या ऐतिहासिक पुलाच्या जागी नवीन आरओबी बांधण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,966चाहतेआवड दर्शवा
1,942अनुयायीअनुकरण करा
40,300सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा