28.2 C
Mumbai
Monday, October 19, 2026
घरविशेषक्रांतिकारी घटना, यावेळी वर्तमानपत्राचा अंक मागे घेतलेला

क्रांतिकारी घटना, यावेळी वर्तमानपत्राचा अंक मागे घेतलेला

Google News Follow

माध्यमांचे जग हे धावते जग, घडामोडींचे जग. काही वर्षांपूर्वी एक अघटीत घडले होते. एका वर्तमानपत्राने अग्रलेख मागे घेतला होता. कधी कोणी विचारही केला नसेल अशी ही घटना. अशा घटना अलिकडे अपवादात्मक राहिलेल्या नाहीत. त्याच परंपरेतील एक बातमी सूत्रांकडून समजते. एका वृत्तसमुहाने वर्तमानपत्राचा अंकच मागे घेतला आहे.

दक्षिण मुंबईतील एक वृत्तसमुह. तिथे गेल्या आठवड्यात बुधवारी घडलेली ही घटना. वर्तमानपत्राच्या कार्यालयात नेहमीप्रमाणे कामाची धामधुम सुरू आहे. वर्तमानपत्राची डाक एडीशन काढण्याची घाई. कारण ही एडीशन छपाईसाठी सर्वात आधी पाठवावी लागते. अंक तयार झाला. प्रेसमध्ये छापून आला. अंकात काही तरी खास, काही तरी स्फोटक होते. प्रेसमधून अंकाचे गठ्ठे गाड्यांमध्ये भरले गेले. डाक एडीशनचा अंक घेऊन गाड्या रवानाही झाल्या. अचानक वर्तमान पत्राच्या कार्यालयात एकाच्या लक्षात आले. अंकात असे काही आहे, जे छापून आले तर खळबळ तर माजेल, परंतु यावेळी कदाचित ती पचणार नाही.  कदाचित बुडाशी येईल. दुकानाला कायमचे टाळे लागले. लगेचच फोनाफोनी सुरू झाली. निर्णय झाला. वर्तमानपत्राच्या इतिहासातील दुसरा क्रांतिकारी निर्णय.

हे ही वाचा:

मध्य रेल्वेची स्वच्छता मोहीम जोरात!

राणीनं डाव जिंकला…सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीत अजितदादा पॅनल २१-०

जुनी मतदार यादी, हातावरच्या गोंदणामुळे २४ वर्षांनी सापडली हरवलेली बहीण

जंतर मंतरमध्ये घुसलेल्या ‘कॉक्रोच’ना घेतले ताब्यात

अंकाचे गठ्ठे घेऊन गेल्या वाहनांच्या चालकांना फोन गेले. थांबा, आहात तिथून परत या. वाहन चालकांना काही कळे ना. पण काय करणार बापडे. मागे फिरले. एक अख्खा अंक मागे घेण्यात आला. वर्तमानपत्राचे गठ्ठे ताब्यात घेऊन इथे तिथे जाणार नाही, याची काळजी घेण्यात आली. काही होते त्या अंकात हे कदाचित कधीही समोर येणार नाही. परंतु बिनबुडाच्या बातम्या देणारे आता पूर्वी सारखे बिनधास्त राहीलेले नाहीत, हे स्पष्ट करणारी ही घटना आहे, हे निश्चित.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
339,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा