30 C
Mumbai
Sunday, June 26, 2022
घरविशेषनेपाळमधील त्या बेपत्ता विमानात ठाण्याचे चार प्रवासी

नेपाळमधील त्या बेपत्ता विमानात ठाण्याचे चार प्रवासी

Related

नेपाळमध्ये तारा एअरलाईन्सच्या विमानाचा रविवार, २९ मे रोजी संपर्क तुटून विमान बेपत्ता झाले होते. अखेर या विमानाचे अवशेष सापडले आहेत. या विमानात चार भरतीयांसह २२ जण प्रवास करत होते. तर हे चार भारतीय महाराष्ट्रातील ठाण्यातील त्रिपाठी कुटुंब होते. मात्र, अद्याप ठाण्यातील अशोक त्रिपाठी कुटुंबामधील चौघांचा शोध लागलेला नाही.

अशोक कुमार त्रिपाठी (५४), वैभवी बांदेकर (५१), धनुष त्रिपाठी (२२) आणि रितिका त्रिपाठी (१५) हे चौघे बेपत्ता आहेत. अशोक त्रिपाठी आणि त्यांची पत्नी वैभवी हे दोघे गेल्या काही वर्षांपूपासून विभक्त राहतात. अशोक हे भुनेशवर येथे राहतात. तर वैभवी या ठाण्यात राहतात. धनुष हा महाविद्यालयात शिकतो तर, त्याची बहीण रितिका ही शाळेत जाते. ही दोन्ही मुले वैभवी यांच्यासोबत राहतात. न्यायालयाच्या आदेशानुसार त्रिपाठी दाम्पत्य वर्षातून एकदा एकत्र येऊन दोन्ही मुलांना दहा दिवस बाहेर फिरायला घेऊन जातात. यंदा त्रिपाठी कुटुंबिय नेपाळमध्ये फिरायला गेले होते. मात्र मध्येच हा दुर्दैवी विमान अपघात झाल्याची घटना घडली.

हे ही वाचा:

पदर्पणाच्या हंगामतच गुजरात टायटन्सने आयपीएलच्या विजेतेपदावर कोरलं नाव

शहीद प्रशांत जाधव यांच्यावर अंत्यसंस्कार; विधवा प्रथेला मूठमाती

पंतप्रधान मोदींनी सांगितली ही योग दिनाची थीम

योगी सरकारचा महिलांसाठी निर्णय, सातच्या आत घरात!

रविवारी सकाळी त्रिपाठी कुटुंब नेपाळमधील पोखराहून जोमसोमला निघालेल्या तारा एअरच्या 9NET ट्विन-इंजिन या विमानातून प्रवास करत होते. त्यांच्यासह एकूण २२ प्रवासी विमानात होते. या विमानाने उड्डाण घेतले आणि त्यानंतर काही वेळातच विमानाचा संपर्क तुटला. या बेपत्ता विमानाचा शोध सुरू असताना त्याचे अवशेष कोवांग गावात सापडले आहेत. याच विमानातून प्रवास करत असलेल्या त्रिपाठी कुटुंबातील चौघेजण बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे, अशी माहिती मिळाली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,936चाहतेआवड दर्शवा
1,920अनुयायीअनुकरण करा
10,800सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा