29 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
घरविशेषपदार्पणाच्या हंगामातच गुजरात टायटन्सने आयपीएलच्या विजेतेपदावर कोरलं नाव

पदार्पणाच्या हंगामातच गुजरात टायटन्सने आयपीएलच्या विजेतेपदावर कोरलं नाव

Google News Follow

Related

इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल स्पर्धेच्या १५व्या हंगामाचा अंतिम सामना पार पडला. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सने सात गडी राखून राजस्थान रॉयल्सचा पराभव करून विजय आपल्या नावे केला. आपल्या पहिल्याच हंगामामध्ये थेट अंतिम सामन्यात धडक मारलेल्या गुजरात टायटन्सची लढत राजस्थान रॉयल्ससोबत झाली. अंतिम सामन्यात पोहचलेले दोन्ही संघ तुल्यबळ समजले जात होते.

सर्वप्रथम राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. राजस्थान रॉयल्सचे फलंदाज या निर्णयाला फारसे योग्य ठरवू शकले नाहीत. राजस्थानचे सलामीवीर जॉस बटलर आणि यशस्वी जयस्वाल यांनी सावध सुरुवात केली मात्र, गुजरात टायटन्सच्या गोलंदाजांपुढे फार वेळ तग धरू शकले नाहीत. या हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या जॉस बटलरला ३५ चेंडूत पाच चौकरांच्या जोरावर ३९ धावा करता आल्या. तर यशस्वी याला १६ चेंडूत २ षटकार आणि १ चौकाराच्या जोरावर २२ धावा करता आल्या. त्यानंतर आलेल्या एकाही फलंदाजाला २० चा आकडाही गाठता आलेला नाही. गुजरात टायटन्सच्या गोलंदाजांनी राजस्थानला १३० धावांमध्ये रोखले. गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्या याने १७ धावा देत ३ महत्त्वाच्या फलंदाजांना तंबूत धाडले. रवीश्रीनिवासन साई किशोर याने दोन षटकात २० धावा देत २ बळी घेतले तर मोहम्मद शामी, राशिद खान आणि यश दयाल यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.

त्यानंतर फलंदाजीसाठी मैदानात उतरलेले गुजरात टायटन्सचे सलामीवीर वृद्धीमान सहा आणि शुभमन गिल यांनी सावध सुरुवात करण्याचा प्रयत्न केला मात्र, ७ चेंडूत ५ धावा करून वृद्धीमान सहा माघारी आला. शुभमन याने ४३ चेंडूत तीन चौकार आणि एक षटकाराच्या जोरावर नाबाद ४५ धावा केल्या. मॅथ्यू वाडे यालाही मोठी खेळ करता आली नाही. कर्णधार हार्दिक पंड्या याने अष्टपैलू खेळी करून ३० चेंडूत तीन चौकार आणि एक षटकाराच्या जोरावर ३४ धावा केल्या आणि संघाला विजयाच्या जवळ नेले. त्यानंतर आलेल्या डेव्हिड मिलर याने १९ चेंडूत तीन चौकार आणि एक षटकाराच्या जोरावर ३२ धावा करत शुभमनच्या साथीने संघाला विजय मिळवून दिला. राजस्थानच्या गोलंदाजांना फारसे यश आले नाही. प्रसिद्ध कृष्णा, युझवेंद्र चहल आणि ट्रेंट बोल्ट यांना प्रत्येकी एक बळी मिळवता आला.

हे ही वाचा:

शहीद प्रशांत जाधव यांच्यावर अंत्यसंस्कार; विधवा प्रथेला मूठमाती

पंतप्रधान मोदींनी सांगितली ही योग दिनाची थीम

योगी सरकारचा महिलांसाठी निर्णय, सातच्या आत घरात!

‘ह्या’ राज्यात आहे देशातील सर्वात जास्त सोन्याचा साठा

गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्या याला सामनावीर पुरस्कार मिळाला तर राजस्थान रॉयल्स संघाचा खेळाडू जॉस बटलर याला मालिकवीर पुरस्कार मिळाला. या हंगामात सर्वाधिक म्हणजेच १७ सामन्यांमध्ये २७ बळी मिळवत राजस्थान रॉयल्सच्या युझवेंद्र चहल याला पर्पल कॅप मिळाली असून राजस्थान रॉयल्सचाच खेळाडू जॉस बटलर याने सर्वाधिक म्हणजेच ८६३ धावा करत ऑरेंज कॅप मिळवली. आयपीएलच्या यावर्षीच्या हंगामात गुजरातच्या संघाचा नव्यानेच समावेश करण्यात आला होता. आपल्या पदापर्णाच्या हंगामातच गुजरातच्या संघाने विजेतेपद मिळवले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा