34 C
Mumbai
Thursday, February 29, 2024
घरविशेषअयोध्येने उघडला ‘गीता प्रेस’साठी नवा अध्याय!

अयोध्येने उघडला ‘गीता प्रेस’साठी नवा अध्याय!

गेल्या दोन वर्षांत १०० कोटींची उलाढाल

Google News Follow

Related

नऊ वर्षांपूर्वी गोरखपूरस्थित ‘गीता प्रेस’ कधीही बंद होईल, अशा अवस्थेत होते. आता मात्र त्यांच्याकडून प्रकाशित होणाऱ्या ‘रामचरितमानस’च्या लोकप्रिय आवृत्तीचा इतका खप वाढला आहे की, सध्या हे पुस्तकच ‘आऊट ऑफ स्टॉक’ झाले आहे. इतकेच नव्हे तर, हिंदू धर्मग्रंथ आणि देवतांशी संबंधित त्यातील बहुतेक पुस्तकांची अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याआधीच तडाखेबंद विक्री होत आहे.

वसाहतवादी राजवट आणि आक्रमक धर्मांतर करणाऱ्यांना रोखण्यासाठी ‘गीता प्रेस’ने कमी किमतीतील पुस्तके काढून हिंदू धर्माचे रक्षण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. आता अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी प्रकाशित केलेल्या ‘रामचरितमानस’ पुस्तकांची मागणी पूर्ण करता येत नसल्याने या प्रकाशनसंस्थेने संपूर्ण ‘रामचरितमानस’ पुस्तक पुढील १५ दिवसांसाठी वेबसाइटवर मोफत दिले आहे. जेणेकरून श्रीरामभक्तांना रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी विधिवत पूजा करता येईल.

मोदी सरकारने गेल्या वर्षी ‘गीता प्रेस’ला गांधी शांतता पुरस्कार जाहीर केल्यानंतर या प्रकाशनसंस्थेने मागणी पूर्ण करण्यासाठी विस्तार करण्याकरिता गंभीरपणे विचार करण्यास सुरुवात केली आणि धार्मिक महत्त्व कमी होणार नाही, हे जाणून तशा रीतीने पावले उचलली. ‘सध्या आम्ही मंगळवारपासून गीता प्रेस वेबसाइटवर रामचरितमानस पुस्तक डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध केले आहे. आता पुढील १५ दिवस हे पुस्तक मोफत डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध असेल. तसेच, सुमारे ५० हजार जण ते डाऊनलोड करू शकतील. मागणी आणखी वाढल्यास आम्ही ही क्षमता आणखी वाढवू. कदाचित आम्ही ही क्षमता एक लाखापर्यंत वाढवू आणि कालावधीतही वाढ करू,’ असे ‘गीता प्रेस’चे व्यवस्य़थापक लालमणी त्रिपाठी यांनी सांगितले.

हे ही वाचा:

ईडी, सीबीआय आणि एनआयएचे पथक लंडनच्या दिशेने!

मंगेशकर कुटुंबियांना राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण

‘त्यांनी’ पत्रकार परिषद घेऊन माझा निर्णय बदलणार नाही!

अयोध्येत काँग्रेस नेत्यांच्या प्रवेशाला लोकांनी केला विरोध!

इतक्या कमी कालावधीत चार लाख प्रतींची छपाई करू शकत नसल्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. ‘जेव्हा मोठ्या संख्येने रामभक्त अयोध्येला प्राणप्रतिष्ठेनंतर भेट देतील, तेव्हा त्यांना ‘रामचरितमानस’च्या रूपात ‘प्रसाद’ घरी नेण्याचा त्यांचा विचार असावा. आम्ही १५ भाषांमध्ये पुस्तके प्रकाशित करतो आणि आमचे अडीच हजार वितरक आहेत. आम्हाला त्यांच्या मागणीचा विचार केलाच पाहिजे, कारण त्यांचे पोटपाणी त्यावर अवलंबून आहे. ही वाढती मागणी पूर्ण करण्याकरिता आमची क्षमता वाढवण्याचे विविध पर्याय आम्ही चाचपडून हात आहोत,’ असे त्यांनी सांगितले.

‘गेल्या एक महिन्यापासून आम्ही एक लाख प्रतींचा पुरवठा करू शकलो, परंतु देशभरातून येत असलेल्या मागणीनुसार पुरवठा करण्यात आम्ही कमी पडत आहोत. नुकतेच आम्हाला जयपूरमदून रामचरितमानसच्या ५० हजार प्रतींची मागमी आली होती. तर, भागलपूरमधून १० हजार प्रतींची मागणी नोंदवण्यात आली. परंतु आम्हाला त्यांना नकार द्यावा लागला,’ असे त्रिपाठी यांनी सांगितले.

वाढती मागणीनुसार पुरवठा करण्यासाठी लवकरच नऊ कोटी रुपये खर्चून प्रिंटिग प्रेस उभारली जाणार आहे. त्यामुळे छपाईच्या क्षमतेत २० टक्क्यांनी वाढ होईल, असे गीता प्रेसचे उत्पादन व्यवस्थापक आशुतोष उपाध्याय यांनी सांगितले. गीता प्रेसने स्थापनेपासून आतापर्यंत विविध पुस्तकांच्या ९५ कोटी प्रती प्रकाशित केल्या आहेत.सन २०१५मध्ये मागणी कमी झाल्यामुळे गीता प्रेस बंद करण्याची वेळ आली होती. मात्र भाजपच्या उदयानंतर देशात धार्मिक भावनांमध्येही वाढ झाल्याने आता गीता प्रेसची उलाढाल सलग दोन वर्षे १०० कोटींपर्यंत पोहोचली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
132,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा