26 C
Mumbai
Sunday, March 26, 2023
घरविशेषगोव्याला जाताय.. मग जेलीफिशपासून सांभाळा. इतक्या लोकांना घेतलाय चावा

गोव्याला जाताय.. मग जेलीफिशपासून सांभाळा. इतक्या लोकांना घेतलाय चावा

पर्यटकांना चावा घेतल्याची अनेक प्रकरणे

Google News Follow

Related

गोव्याला जाताय तर सांभाळून. समुद्र किनारी पोहतांना जास्त सतर्क रहा. नाही तर एखादी जेलीफिश येऊन चावा घायची. सध्या गोवा समुद्र किनाऱ्यावर जेलफिश चावा घेण्याचे प्रकार घडत आहेत. हा प्रकार तीन महिन्यांपासून घडत आहे. गेल्या तीन महिन्यात गोव्याच्या समुद्रात पोहतांना जेलीफिश चावल्याचा जवळपास ८५० पेक्षा जास्त जणांनी दावा केला आहे.

हा हल्ला बहुतांश करून कमी गर्दी असलेल्या दक्षिण गोव्यातील समुद्र किनारी होत असल्याचे सांगण्यात येत आहे. या किनाऱ्यावर ७१० लोकांना चावा घेतळ आहे. हे जेलीफिश रोज किमान ८-९ लोकांवर हल्ला करतात असे येथील लाईफगार्डचे म्हणणे आहे.

एकट्या बेतालबाती किनाऱ्यावर २२५ घटना नोंदवण्यात आल्या आहेत, तर कोलवामध्ये १८० आणि बेनौलीम आणि झालोर समुद्रकिनाऱयावर दररोज ५० नवीन प्रकरणे नोंदवली जात आहेत. स्विमथॉन सहभागी झालेल्या १२५ जणांनी जेलीफिशच्या हल्ल्याची तक्रार केली. उत्तर गोव्यातील सर्वाधिक गर्दीच्या किनार्‍यावर अशा प्रकारच्या केवळ १४० घटना नोंदवण्यात आल्या, तर कलंगुट आणि बागा येथे प्रत्येकी ६० घटनांची नोंद झाली आहे.

हे ही वाचा:

खलिस्तान्यांचे कारस्थान; कॅनडातील श्रीराम मंदिरावर भारतविरोधी घोषणा

वरळीत ४२व्या मजल्यावरून कोसळले सिमेंटचे ब्लॉक; दोन जणांचा मृत्यू

लगानची कॉमेंट्री झाली मूक .. जावेद खान यांनी घेतला जगाचा निरोप

सत्यजित तांबे ट्विटमधून नेमके म्हणताहेत तरी काय?

गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यांवर जेलीफिशचे हल्ले एकेकाळी अत्यंत दुर्मिळ मानले जात होते.जेलीफिशचे दोन प्रकार आहेत – विषारी आणि बिन-विषारी. बहुतेक जेलीफिशचे डंख मानवांसाठी हानिकारक नसतात. फक्त सौम्य जळजळ होते. परंतु अत्यंत दुर्मिळ प्रकरणांमध्ये, जेलीफिशच्या डंखामुळे कधीकधी लोकांना श्वास घेण्यात अडचण येते आणि छातीत दुखू शकते. अलीकडच्या काळात, पोर्तुगीज मॅन ओ’ वॉर, सामान्यतः ब्लूबॉटल म्हणून ओळखले जाणारे जेलीफिश गोव्याच्या समुद्रात आढळून आले आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,880चाहतेआवड दर्शवा
2,035अनुयायीअनुकरण करा
65,400सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा